Ajit Pawar Funeral
Ajit Pawar Funeral

Ajit Pawar Funeral : अलविदा अजित दादा...; अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा बांध फुटला

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Ajit Pawar Funeral) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताचे भयावह फोटो, व्हिडिओ समोर आले असून विमान उतरत असताना एका शेतात कोसळल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवारांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथे अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Ajit Pawar Funeral
Ajit Pawar Funeral : लाडक्या अजित दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी काटेवाडीत मोठी गर्दी

दादांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केल्याची माहिती मिळत आहे. कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. लोकांचा विश्वासच बसत नाही आहे की, त्यांचे लाडके अजित दादा त्यांना सोडून गेलेत. लाडक्या अजित दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा बांध फुटला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com