Ajit Pawar Death in Plane Crash
Ajit Pawar Death in Plane Crash

Ajit Pawar Death in Plane Crash : अपघातापूर्वी अजित पवारांचा 'तो' शेवटचा फोन कॉल कुणाला?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Ajit Pawar Death in Plane Crash ) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे. बारामतीजवळील विमान अपघातात पाच सहकाऱ्यांसह अजित पवारांचा मृत्यू झाला. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

या अपघाताचे भयावह फोटो, व्हिडिओ समोर आले असून विमान उतरत असताना एका शेतात कोसळल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे.

या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.यातच आता एक नवी माहिती समोर येत आहे. ती म्हणजे अपघातापूर्वी अजित पवारांनी शेवटचा फोन कॉल भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना केला असल्याची माहिती मिळत आहे. विमानात बसण्यापूर्वी अजित पवारांचं राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी बोलणं झालं होते. त्यानंतर बारामतीत उतरल्यावर पुढील बोलणं होणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com