Nagpur : नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बनावट स्वाक्षरीने शिफारसपत्र तयार करून महिलेची फसवणूक
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nagpur) मुख्यमंत्र्यांच्या बनावट स्वाक्षरीने शिफारसपत्र तयार करून महिलेची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. अडीच लाखांची महिलेची फसवणूक केल्याचं समोर आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने खोटे शिफारसपत्र तयार केल्याचे उघड झाले.
वैभव भैय्याजी सेवतकर असे आरोपीचे नाव असून सीताबर्डी पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे. बदली नागपूर, अमरावती किंवा चंद्रपूरला मिळवून देतो असे आमिष दाखवले तसेच आरोपीने आपण वीज वितरण विभागात कर्मचारी असल्याचा बनाव केला.
पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली असून अशाच प्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
Summary
नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बनावट स्वाक्षरीने फसवणूक
बनावट स्वाक्षरीने शिफारसपत्र तयार करून महिलेची फसवणूक
अडीच लाखांची महिलेची फसवणूक केल्याचं समोर
