Zilla Parishad Election : जिल्हा परिषद, पंचायत समितीचा आज निकाल; कोण गुलाल उधळणार?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Zilla Parishad Election) राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 तारखेला मतदान पार पडलं. काल सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत मतदान पार पडलं असून आज सोमवारी 9 तारखेला मतमोजणी पार पडणार असून निकाल लागणार आहे.
यासोबतच आज 9 तारखेला सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. या निवडणुकीसाठी 7 हजार 438 उमेदवार रिंगणात होते. 12 जिल्ह्यांमध्ये सरासरी 68.28 टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती मिळत आहे. मतमोजणी केंद्राबाहेर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोया पूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून आता आज कोण गुलाल उधळणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया संपन्न
प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी सुरू
जिल्हा परिषदेवर सत्ता कुणाची? आज लागणार निकाल
