Pune
Pune

Pune : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी गर्दी; उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस

जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

( Pune ) जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून राज्यात 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून रोजी 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आता पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. बंडखोरी टाळण्यासाठी कुठल्याही पक्षांकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली नाही आहे.

आघाडी युतीवर पुण्यात संभ्रम कायम तर काँग्रेस वंचितच्या आघाडीची घोषणा झाली असून भाजप शिवसेना युतीची चर्चा अद्याप अपूर्ण असून शिवसेनेने भाजपाकडे यादी पाठवली असल्याची माहिती मिळत आहे. वंचित आणि काँग्रेसने आघाडीची घोषणा करून जिल्हा परिषदेची तयारी सुरू केली आहे.

Summary

  • पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी गर्दी

  • उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस

  • बंडखोरी टाळण्यासाठी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर नाही

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com