Pune : अजित पवार यांच्या निधनानंतर 10 दिवसांतच महापालिकेचा कार्यक्रम; मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कार्यक्रम रद्द करण्याच्या दिल्या सूचना
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Pune ) अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे.
या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. यातच आता अजित पवार यांच्या निधनाला 10 दिवस होत नाही तोच महापालिकेने नाच गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 15 तारखेला महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.
त्यामुळे यावर संताप व्यक्त केला जात होता. याच पार्श्वभूमीवर आता पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून याची दखल घेण्यात आली असून पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना कार्यक्रम रद्द करण्याचे तातडीने सूचना देण्यात आल्या. फोन करून मोहोळ यांनी आयुक्तांना सूचना दिल्याची माहिती मिळत आहे.
Summary
अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
अजित पवार यांच्या निधनाला 10 दिवस होत नाही तोच महापालिकेने ठेवला कार्यक्रम
मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संताप व्यक्त करत कार्यक्रम रद्द करण्याच्या दिल्या सूचना
