Pune
Pune

Pune : पुणे महापालिका अभय योजनेला पुन्हा मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत थकबाकी भरता येणार

पुणे महापालिका अभय योजनेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Pune) पुणे महापालिका अभय योजनेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अभय योजनेअंतर्गत मिळकतकराच्या थकीत रकमेवर ७५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत आहे.

या योजनेस एक महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर आता या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. अभय योजनेची मुदत 15 फेब्रुवारीला संपणार होती.

आता महापालिका कर विभागाकडून अभय योजनेस 15 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. या मुदतवाढीमुळे आता मिळकतधारकांना मोठा दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.

Summary

  • पुणे महापालिका अभय योजनेला पुन्हा मुदतवाढ

  • 15 मार्चपर्यंत थकबाकी भरता येणार

  • दंडातील 75% सूट कायम

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com