Sharad Pawar : शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा; रूबी हॉल प्रशासनाकडून मेडिकल बुलेटिन जारी
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sharad Pawar) शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना पुण्यातील रूबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवारांना कफचा त्रास झाल्याने त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
याच पार्श्वभूमीवर आता शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा रूबी हॉल प्रशासनाकडून मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आले आहे. शरद पवार यांची प्रकृती उत्तम आणि तब्येतीत सुधारणा होत असल्याचे रुबी हॉल चे ट्रस्टी सिमोन ग्रँट यांनी सांगितले. शारीरिक परिश्रम केल्यामुळे त्यांच्या तब्येतीत काल थकवा जाणवत होता अशी डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
पुढील उपचाराबाबत लवकरच निर्णय घेतले जातील पण आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल परिसरात गर्दी न करण्याचे रुबी हॉल क्लिनिककडून आवाहन करण्यात आले आहे.
Summary
शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रूबी हॉल प्रशासनाकडून मेडिकल बुलेटिन जारी
शरद पवार यांची प्रकृती उत्तम आणि तब्येतीत सुधारणा, रुबी हॉल चे ट्रस्टी सिमोन ग्रँट यांची माहिती
शारीरिक परिश्रम केल्यामुळे त्यांच्या तब्येतीत काल थकवा जाणवत होता, डॉक्टरांची माहिती
