Sharad Pawar : शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा; पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sharad Pawar) शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना पुण्यातील रूबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवारांना कफचा त्रास झाल्याने त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
याच पार्श्वभूमीवर आता शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा रूबी हॉल प्रशासनाकडून काल मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आले आहे. पुढील उपचाराबाबत लवकरच निर्णय घेतले जातील पण आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असल्याचं डॉक्टरांनी सांगितले.
याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून 5 दिवस रुग्णालयात उपचार घेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला असल्याची माहिती मिळत आहे. छातीत कफ असल्याने श्वास घेण्यास आणि बोलण्यास त्रास होत होता. त्यामुळे शरद पवार पूर्णपणे डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार उपचार घेतील असे सांगण्यात आले आहे.
Summary
शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा
पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू
5 दिवस रुग्णालयात उपचार घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला
