Pune Mhada Lottery
Pune Mhada Lottery

Pune Mhada Lottery : पुणे मंडळाची 4 हजार 186 घरांची सोडत मार्गी लागणार; पुणे म्हाडा घरांची सोडत आज काढण्यात येणार

पुणे मंडळाची 4 हजार 186 घरांची सोडत मार्गी लागणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Pune Mhada Lottery ) पुणे मंडळाची 4 हजार 186 घरांची सोडत मार्गी लागणार आहे. तांत्रिक अडचणी आणि निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेली ही पुणे मंडळाची 4 हजार 186 घरांची सोडत आता मार्गी लागणार असून सोडतीसाठी आज 10 फेब्रुवारीचा मुहूर्त निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

9 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपली असून आणि त्यानंतर लगेच सोडत मार्गी लागणार आहे. आज दुपारी 12 वाजता काढली जाणार आहे. जिल्हा परिषद सभागृहात ही सोडत होणार आहे.

या सोडतीमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील घरे समाविष्ट असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • पुणे म्हाडा घरांची सोडत आज काढण्यात येणार

  • आज दुपारी 12 वाजता सोडत काढली जाणार

  • 4 हजार 186 सदनिकांची सोडत असणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com