Metro Slab Collapsed : '100 टक्के निष्काळजीपणा दिसतो...', महापौर रितू तावडे यांचं वक्तव्य
Mumbaiमध्ये आज दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. Mulund (पश्चिम) येथील एलबीएस रोडवर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामादरम्यान उभारण्यात येत असलेल्या खांबाचा काही भाग अचानक खाली कोसळला. हा अवजड सिमेंटचा तुकडा रस्त्याने जाणाऱ्या एका ऑटोरिक्षावर आदळला. या अपघातात चार जण जखमी झाले असून उपचारादरम्यान एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर मुंबईचे महापौर रितू तावडे या घटनास्थळी आल्या होत्या. यावेळी त्यांनी पाहणी केली आहे.
यावेळी त्या म्हणाल्या की, "मुलूंडची दुर्घटना हा प्रशासनाचा 100 टक्के निष्काळजीपणा आहे. आमदारांकडून अधिक माहिती घेणार अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर रितू तावडेंची प्रतिक्रिया दिली आहे."
नेमकं प्रकरण काय?
Mulund (पश्चिम) येथील एलबीएस रोडवर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामादरम्यान उभारण्यात येत असलेल्या खांबाचा काही भाग अचानक खाली कोसळला.काम सुरू असताना सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली काही व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती. यामुळेच हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित यंत्रणा घटनेची सखोल चौकशी करत आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
थोडक्यात
आज दुपारी Mumbai मध्ये हृदयद्रावक घटना घडली.
Mulund (पश्चिम) येथील एलबीएस रोडवर सुरू असलेल्या मेट्रो कामादरम्यान उभारण्यात येत असलेल्या खांबाचा काही भाग अचानक खाली कोसळला.
अवजड सिमेंटचा तुकडा रस्त्याने जाणाऱ्या एका ऑटोरिक्षावर आदळला.
या अपघातात चार जण जखमी झाले आणि उपचारादरम्यान एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.
या घटनेनंतर Ritu Tawde घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली.
अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

