Badlapur : विद्यार्थिनीच्या अत्याचारानं हादरलं; 4 वर्षाच्या विद्यार्थिनीवर शाळेच्या बसमध्ये नराधम चालकाचा अत्याचार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Badlapur) बदलापूर शहर पुन्हा एकदा अत्याचाराच्या घटनेनं हादरलं आहे. 4 वर्षाच्या विद्यार्थिनीवर शाळेच्या बसमध्ये नराधम चालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खाजगी इंग्रजी शाळेच्या स्कूल व्हॅनमध्ये या ४ वर्षाच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. बसमध्ये महिला मदतनीस नसल्याची देखील धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
याच्याआधी बदलापुरात झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आता पुन्हा एकदा ही धक्कादायक घटना घडली आहे. मुलीच्या पालकांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे गाठलं असून या संदर्भात तक्रार दिली असून पोलिसांनी या वाहन चालकाला ताब्यात घेतला आहे.
Summary
बदलापुरात विद्यार्थिनीच्या अत्याचारानं हादरलं
4 वर्षाच्या विद्यार्थिनीवर अत्याचार
शाळेच्या बसमध्ये नराधम चालकाचा विद्यार्थिनीवर अत्याचा
