Samadhan Sarvankar
मुंबई
Samadhan Sarvankar : मुंबईत महायुतीत वादाची ठिणगी; समाधान सरवणकरांच्या विरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक
मुंबईत महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Samadhan Sarvankar) महापालिका निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाले असून मुंबईत महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपवर आरोप करणाऱ्या समाधान सरवणकरांच्या विरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.
सरवणकर भाजपविरोधात सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सरवणकरांच्या विरोधात माहिममधील भाजप पदाधिकारी सायबर सेलकडे तक्रार करणार असल्याची माहिती मिळत आहे.
भाजपने सहकार्य न केल्याने निवडणुकीत पराभव झाल्याचा सरवणकरांकडून आरोप करण्यात आला होता. वांद्रे येथे सायबर सेलमध्ये आज दुपारी 12 वाजता तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
मुंबईत महायुतीत वादाची ठिणगी
समाधान सरवणकरांच्या विरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक
सरवणकर खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप
