Mumbai BMC
मुंबई
Mumbai BMC : मुंबई महापालिकेची पहिली सभा 16 फेब्रुवारीला; विरोधी पक्ष नेता, सभागृह निवडीकडे लक्ष
मुंबई महापालिकेची पहिली सभा 16 फेब्रुवारीला पार पडणार आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai BMC) मुंबई महापालिकेची पहिली सभा 16 फेब्रुवारीला पार पडणार आहे. 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षाच्या नेत्याची निवड मुंबई महापालिकेत होणार असल्याची माहिती मिळत असून विरोधी पक्ष नेता, सभागृह निवडीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
23 फेब्रुवारीला सुधार आणि बेस्ट समितीच्या सदस्यांची निवड केली जाणार असून 24 फेब्रुवारीला विशेष सभा बोलावून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
शोक प्रस्ताव आणून दिवसभर सभागृह तहकूब केले जाणार असून त्यानंतर 25 तारखेला इतर विशेष समित्यांच्या अध्यक्ष पदासाठी निवड होणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
मुंबई महापालिकेची पहिली सभा 16 फेब्रुवारीला
विरोधी पक्ष नेता, सभागृह निवडीकडे लक्ष
सुधार, बेस्ट समिती अध्यक्षांची 23 तारखेला निवड
