Kalyan-Dombivli
मुंबई
Kalyan-Dombivli : ठाकरे गटाचे 4 नगरसेवक नॉट-रिचेबल, कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
कल्याण-डोंबिवलीत राजकीय वातावरण तापलं असतानाच आता ठाकरे गटाचे नवनिर्वाचित 4 नगरसेवक नॉट-रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Kalyan-Dombivli) कल्याण-डोंबिवलीत राजकीय वातावरण तापलं असतानाच आता ठाकरे गटाचे नवनिर्वाचित 4 नगरसेवक नॉट-रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे.
ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निवडून आले असून यामधले 2 जण मधुर उमेश म्हात्रे आणि कीर्ती राजन ढोणे हे 16 जानेवारीपासून संपर्काबाहेर असल्याची माहिती मिळत आहे.
सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्ससह तपास करून तातडीने शोधमोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली असून जिथे असाल तिथून माध्यमांसमोर या, असे आवाहन शरद पाटील यांनी केले आहे. या प्रकरणी आता पक्षातील नवनिर्वाचित नगरसेवक अचानक नॉट-रिचेबल झाल्याने थेट पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Summary
ठाकरेसेनेचे 4 नगरसेवक नॉट-रिचेबल
कल्याण-डोंबिवलीतील नगरसेवक नॉट-रिचेबल
शोधासाठी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार
