Monorail Update
Monorail Update

Monorail Update : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! बंद असलेली मोनोरेल पुन्हा एकदा धावणार

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Monorail Update ) मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मोनोरेल आता पुन्हा एकदा धावणार आहे. संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर मोनोरेल लवकरच पुन्हा धावणार असून तिची मार्गिका सुरू करण्यासाठी आवश्यक इंडिपेंडंट सेफ्टी असेसमेंट ही सुरक्षा तपासणी सुरू करण्यात आल्याची माहिती ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्याने दिली.

प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. ही मोनोरेल 20 सप्टेंबरपासून अनिश्चित काळासाठी बंद होती. मार्गिकेवर नवीन यंत्रणा बसवण्यासाठी ही बंद ठेवण्यात आली असून मोनोरेलची तपासणी केली जाणार असून त्यासाठी अधिकारी देखील नियुक्त केला जाणार आहे.

Summary

  • मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी!

  • बंद असलेली मोनोरेल पुन्हा एकदा सेवेसाठी सज्ज

  • मार्गिकेवर नवीन यंत्रणा बसवण्यासाठी मोनोरेल बंद ठेवण्यात आली

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com