Coastal Road
Coastal Road

Coastal Road : भारतातील पहिला संगीतमय रस्ता मुंबईत; कोस्टल रोडवरून प्रवास करताना ऐकायला येणार ‘जय हो’ ची धून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

भारतातील पहिला संगीतमय रस्ता मुंबईत असणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Coastal Road ) भारतातील पहिला संगीतमय रस्ता मुंबईत असणार आहे. कोस्टल रोडवरून गाडी जाताच आता ‘जय हो’ ची धून ऐकायला येणार असून माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बनविण्यात आलेल्या या देशातील पहिल्या मेलडी रोडचे लोकार्पण बुधवारी दुपारी 12.30 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले जाणार आहे.

अमरसन्स गार्डन ते ब्रिच कँडी दरम्यान पहिल्या मार्गिकेतील सुमारे 700 मीटर रस्त्यावर वाहनचालकांना या मेलडी रोडचा अनुभव घेता येणार असल्याची माहिती मिळत आहे.

या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना हंगेरियन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ‘जय हो’ या गाण्याची धून ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे आता हा मार्ग आता देशातला सर्वांत पहिला मेलडी रोड म्हणून ओळखला जाणार आहे.

Summary

  • भारतातील पहिला संगीतमय रस्ता मुंबईत

  • 'कोस्टल रोड'वर येताच ऐकायला येणार ‘जय हो’ ची धून

  • मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार लोकार्पण

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com