Mumbai : जोगेश्वरी पश्चिम परिसरात ओशिवरा पोलिसांची मोठी कारवाई; अवैधरित्या राहणाऱ्या 5 बांगलादेशी नागरिकांना अटक

जोगेश्वरी पश्चिम परिसरात ओशिवरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Mumbai) जोगेश्वरी पश्चिम परिसरात ओशिवरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भारतात अवैधरित्या दाखल होऊन हे सर्व बांगलादेशी नागरिक मुंबई शहरात मागील काही वर्षापासून राहत होते.

जोगेश्वरी पश्चिम परिसरात ओशिवरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत बांगलादेशी नागरिक राहत असल्याचं ओशिवरा पोलिसांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती.

याच माहितीच्या आधारे ओशिवरा पोलिसांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एटीसी पथकाने जोगेश्वरी बहराम बाग परिसरात सापळा रचून ही कारवाई केली असून अवैधरित्या राहणाऱ्या 5 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

Summary

  • मुंबईत 5 बांगलादेशी नागरिकांना अटक

  • मुंबईच्या जोगेश्वरी परिसरातून अटक

  • ओशिवरा पोलिसांची मोठी कारवाई

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com