Kandivali Bus Fire
मुंबई
Kandivali Bus Fire : कांदिवलीच्या पोईसर मेट्रो स्थानकाजवळ बसला भीषण आग; बस पूर्णपणे जळून खाक
कांदिवलीच्या पोईसर मेट्रो स्थानकाजवळ बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Kandivali Bus Fire) कांदिवलीच्या पोईसर मेट्रो स्थानकाजवळ बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कांदिवली पूर्व येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोईसर मेट्रो स्थानकाजवळ बसला ही भीषण आग लागली.
चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांना तात्काळ सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली. यामध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली.
Summary
कांदिवलीच्या पोईसर मेट्रो स्थानकाजवळ बसला भीषण आग
आगीत कोणतीही जीवितहानी नाही
अग्निशमन दलास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
