Metro Slab Collapsed On Devendra Fandvis
Metro Slab Collapsed On Devendra Fandvis :

Metro Slab Collapsed : मुंबईत मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळला; एकाचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Mumbaiमध्ये आज दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. Mulund (पश्चिम) येथील एलबीएस रोडवर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामादरम्यान उभारण्यात येत असलेल्या खांबाचा काही भाग अचानक खाली कोसळला.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Metro Slab Collapsed On Devendra Fandvis : Mumbaiमध्ये आज दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. Mulund (पश्चिम) येथील एलबीएस रोडवर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामादरम्यान उभारण्यात येत असलेल्या खांबाचा काही भाग अचानक खाली कोसळला. हा अवजड सिमेंटचा तुकडा रस्त्याने जाणाऱ्या एका ऑटोरिक्षावर आदळला. या अपघातात चार जण जखमी झाले असून उपचारादरम्यान एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्स पोस्ट टाकत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस एक्स पोस्टवर लिहितात की, "मुंबईतील मुलुंड भागात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून इतर काही जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे."

नेमकं प्रकरण काय?

Mulund (पश्चिम) येथील एलबीएस रोडवर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामादरम्यान उभारण्यात येत असलेल्या खांबाचा काही भाग अचानक खाली कोसळला.काम सुरू असताना सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली काही व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती. यामुळेच हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित यंत्रणा घटनेची सखोल चौकशी करत आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com