Mumbai Air Pollution : मुंबईच्या हवेचा स्तर खालावला; प्रदूषणाची समस्या 'जैसे थे'
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai Pollution) मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा ढासळण्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील भागांमध्ये प्रदूषणाचा कहर पाहायला मिळतो आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
मुंबईमध्ये प्रदूषणात झपाट्याने वाढ होत आहे. मागच्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असून यामुळे अनेक आजार बळावण्याची शक्यता आहे.शहरातील हवेची गुणवत्ता निर्देशांक वाईट श्रेणीत नोंदवली गेली आहे.
मुंबईतील प्रदूषणाची समस्या 'जैसे थे' असल्याचे पाहायला मिळत असून यासोबतच थंडी कमी झाली असून उकाडा वाढला आहे. त्यामुळे उकाडा आणि प्रदूषणामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.
रविवारी शहराच्या अनेक भागांत हवेचा गुणवत्ता निर्देशांक AQI 175 वर पोहचल्याचे पाहायला मिळाले. तर तापमानाने 35 अंशांची उच्चांकी पातळी गाठली.
Summary
प्रदूषणाला उकाड्याचा तडका!
मुंबईतील प्रदूषणाची समस्या 'जैसे थे'
तर तापमानाने गाठली 35 अंशांची उच्चांकी पातळी
