Mumbai Mayor : मुंबई महापौरपदाची निवडणूक लवकरच जाहीर होणार; 'या' तारखेला मुंबईचा महापौर बसण्याची शक्यता
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai Mayor) महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आता या निकालानंतर लक्ष लागले आहे ते म्हणजे महापौर आणि उपमहापौर कोण होणार? याच पार्श्वभूमीवर आता मुंबई महापौरपदाची निवडणूक लवकरच जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
11 फेब्रुवारीला मुंबईचा महापौर बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून 18 फेब्रुवारीला विशेष सभा होणार असल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत पालिकेचा 2026 आणि 27 अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.
त्यामुळे आता या मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून मुंबईचा महापौर कोण होणार? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
मुंबई महापौरपदाची निवडणूक लवकरच जाहीर होणार
11 फेब्रुवारीला मुंबईचा महापौर बसण्याची शक्यता
18 फेब्रुवारीला विशेष सभा होण्याची शक्यता
