BMC Budget 2026
BMC Budget 2026

BMC Budget 2026 : आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार

आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

( BMC Budget 2026 ) आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प ८० हजार कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी हे स्थायी समिती अध्यक्षांकडे हा महत्त्वाचा अर्थसंकल्प सादर करतील.

स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना हा अर्थसंकल्प सादर केला जाईल.आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिकांपैकी एक असलेल्या मुंबईचा 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प आज मांडण्यात येणार असून महापालिका रस्ते, पूल आणि पाईपलाईन, आरोग्य व्यवस्थापन, शिक्षण, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन यासारख्या पायाभूत सुविधांवर खर्च करते.

मुंबई महापालिकेचा सन 2025–26 या वर्षासाठी महापालिकेचा एकूण अर्थसंकल्प 74,427.41 कोटी रुपये होता. आज सकाळी 11 वाजता हा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात कोणत्या नवीन घोषणा होणार याबाबत उत्सुकता असून महापालिकेच्या अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय मिळणार? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Summary

  • आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार

  • यंदाचा अर्थसंकल्प ८० हजार कोटी रुपये असण्याची शक्यता

  • महापालिकेच्या अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय मिळणार? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com