Mumbai : मुंबई पालिकेत हालचालींना वेग; स्थायी समिती, शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai) मुंबई महापालिकेत हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडीपासून ते अर्थसंकल्प आणि विशेष समित्यांच्या निवडीपर्यंतचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
स्थायी समिती, शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार असून स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 16 फेब्रुवारीला समित्यांचे विषय पटलावर ठेवले जाणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी सुधार समिती आणि बेस्ट समिती अध्यक्षांची निवड होणार आहे.
24 फेब्रुवारीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली आणि दुखवटा प्रस्ताव मांडण्यात येणार असून हा दिवस शोकप्रस्तावासाठी राखून ठेवण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. स्वीकृत सदस्यही याच दिवशी घोषित करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
मुंबई पालिकेत हालचालींना वेग
स्थायी समिती, शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक
20 फेब्रुवारीला पार पडणार निवडणूक
