BMC Restructuring : महानगरपालिकेत बदल! स्थायी ते बेस्ट परिवहन, नगरसेवकांसाठी नवे पाऊल

BMC Restructuring : महानगरपालिकेत बदल! स्थायी ते बेस्ट परिवहन, नगरसेवकांसाठी नवे पाऊल

मुंबई महानगरपालिका (बीएमसी) मध्ये महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर आता विविध महत्वाच्या समित्यांची पुनर्रचना पूर्ण झाली असून सर्वपक्षीय नगरसेवकांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

मुंबई महानगरपालिका (बीएमसी) मध्ये महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर आता विविध महत्वाच्या समित्यांची पुनर्रचना पूर्ण झाली असून सर्वपक्षीय नगरसेवकांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही समिती पातळीवर भूमिका बजावण्याची संधी मिळाली आहे. आता अध्यक्षपदांची निवड कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे राजकीय वर्तुळासह मुंबईकरांचेही लक्ष लागले आहे.

महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेना गटनेतेपदी अमेय घोले यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. याच बैठकीत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती जाहीर झाली. सभागृहात घोषणाबाजी आणि राजकीय टोलेबाजी रंगली असली तरी समित्यांची रचना मात्र सर्वपक्षीय संतुलन राखत करण्यात आली.

स्थायी समिती : सत्ताकेंद्रावर भाजपची नजर

महापालिकेतील सर्वाधिक महत्वाची मानली जाणारी स्थायी समिती सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अध्यक्षपदासाठी भाजपकडून प्रभाकर शिंदे आणि हरीश बांगिर्डे यांची नावे आघाडीवर असल्याचे समजते. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडून होणार असला तरी या दोघांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • स्थायी समितीवर भाजपचे गणेश खणकर, राखी जाधव, मकरंद नार्वेकर, सुरेश झा, शीतल गंभीर, प्रकाश दरेकर, प्रीती साताम, तेजेंद्र सिंग तेजा यांसह एकूण दहा सदस्यांची वर्णी लागली आहे.

  • शिवसेना (ठाकरे गट) कडून श्रद्धा जाधव, रमाकांत रहाटे, लक्ष्मी भाटिया, दीपमाला बडे, मीनाक्षी पाटणकर, यशोधर फणसे आणि जगदीश यांचा समावेश आहे.

  • शिवसेना (शिंदे गट) कडून अमेय घोले, यामिनी जाधव आणि अंजली नाईक यांना संधी देण्यात आली आहे.

याशिवाय काँग्रेसकडून अजंता यादव, अश्रफ आझमी, ट्युलिप मिरांडा, मनसेकडून यशवंत किल्लेदार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहीदा खान आणि एमआयएमकडून विजय उबाळे यांचा समावेश करण्यात आला आहे.

सुधार समिती : शिवसेनेकडून संध्या दोषींचे नाव चर्चेत

शहर विकासाशी निगडित असलेल्या सुधार समितीवरही सर्व पक्षांना स्थान देण्यात आले आहे. अध्यक्षपदासाठी शिवसेना (शिंदे गट) कडून संध्या दोषी यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे.

  • भाजपकडून प्रकाश गंगाधरे, अलका केरकर, चित्तरंजन शर्मा, महादेव शिवगण, दीपक तावडे, स्वप्ना म्हात्रे, अनिश मखवाणी, तेजस्वी घोसाळकर, साक्षी दळवी आणि संदीप पटेल यांची निवड झाली आहे.

  • ठाकरे गटाकडून मिलिंद वैद्य, विशाखा राऊत, विठ्ठल लोकरे, सचिन पडवळ, उर्मिला पानचाल, हिरालाल आणि लोणा रावळ यांचा समावेश आहे.

  • शिंदे गटाकडून अमेय घोले, संध्या दोषी, किरण लांडगे आणि अजित रावराणे यांना संधी देण्यात आली आहे.

  • काँग्रेसकडून आश्रफ आझमी, खान मिरज, हैदर मोसीन, एमआयएमकडून शबाना शेख आणि मनसेकडून सुप्रिया दळवी यांची निवड झाली आहे.

शिक्षण समिती : अध्यक्षपदासाठी चुरस

शिक्षण क्षेत्राशी संबंधित समितीतही राजकीय चढाओढ पाहायला मिळत आहे. अध्यक्षपदासाठी भाजपकडून राजेश्री शिरोडकर आणि तेजस्विनी घोसाळकर यांच्यात स्पर्धा असल्याचे बोलले जात आहे. बिगर सदस्य म्हणून भाजपचे निखिल व्यास आणि योजना ठोकळे, ठाकरे गटाच्या प्रियांका राऊत आणि शिंदे गटाच्या चंद्रावती मोरे यांचा समावेश करण्यात आला आहे.

बेस्ट परिवहन समिती : तृष्णा विश्वासराव आघाडीवर?

मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणाऱ्या बेस्ट परिवहन समितीवर अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून तृष्णा विश्वासराव यांचे नाव चर्चेत आहे.या समितीवर भाजपकडून आकाश राजपुरोहित, संतोष मेडेकर, रमाकांत गुप्ता, सुनील गणाचार्य आणि प्रमोद वाकोडे यांचा समावेश आहे. ठाकरे गटाकडून प्रविणा मोरोजकर, सुनील, नितीन नादगावकर आणि सुमित अहिर यांना संधी देण्यात आली आहे. शिंदे गटाकडून उपेंद्र सावंत, काँग्रेसकडून आशा कोपरकर आणि चंद्रकांत मजलीकर, तर एमआयएमकडून सैफल खान यांची निवड झाली आहे.

अध्यक्षपदांवर अंतिम निर्णय कधी?

समित्यांची सदस्यनियुक्ती जाहीर झाल्याने आता अध्यक्षपदांच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष आहे. स्थायी, सुधार, शिक्षण आणि बेस्ट या चार प्रमुख समित्यांवरील अध्यक्ष कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. महापालिकेतील सत्तासमीकरण आणि आगामी राजकीय रणनीती लक्षात घेता या अध्यक्षपदांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत होणारे निर्णय मुंबईच्या राजकारणाची दिशा ठरवणारे ठरतील, यात शंका नाही.

थोडक्यात

  1. मुंबई महानगरपालिका (BMC) मध्ये महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर विविध महत्वाच्या समित्यांची पुनर्रचना पूर्ण झाली आहे.

  2. सर्वपक्षीय नगरसेवकांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

  3. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही समिती पातळीवर भूमिका बजावण्याची संधी मिळाली आहे.

  4. अध्यक्षपदांची निवड कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे राजकीय वर्तुळासह मुंबईकरांचेही लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com