Mulund Metro Accident : काँक्रीट कोसळल्याने एकाचा मृत्यू, काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी
Mumbaiमध्ये मेट्रो कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. मुलुंड Mulund येथील एलबीएस LBS रोडवर सुरू असलेल्या Mumbai Metro Line 4 प्रकल्पातील काँक्रीटचा भाग अचानक कोसळून दोन वाहनांवर आदळला. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर (Maharashtra Pradesh Congress Committee) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष (Harshvardhan Sapkal) हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या मते, ही घटना म्हणजे निकृष्ट दर्जाच्या कामाचे द्योतक असून सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम आहे. लोकवस्तीच्या भागात काम सुरू असताना आवश्यक खबरदारी का घेतली गेली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच, श्रेय घेण्याइतकीच जबाबदारीही स्वीकारावी, अशी मागणी त्यांनी केली. मोठ्या प्रकल्पांवर कोट्यवधींचा खर्च होत असताना जर अशा घटना घडत असतील, तर हा विकास नेमका कोणासाठी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून ठोस पावले उचलावीत, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
थोडक्यात
आज दुपारी Mumbai मध्ये मेट्रो कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली.
Mulund येथील एलबीएस रोडवर सुरू असलेल्या Mumbai Metro Line 4 प्रकल्पातील काँक्रीटचा भाग अचानक कोसळला.
कोसलेला काँक्रीट दोन वाहनांवर आदळला.
या अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
तात्काळ अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले.
जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

