Dadar
Dadar

Dadar : दादरमध्ये पाळीव श्वानाने 7 वर्षाच्या मुलाच्या हाताचा घेतला चावा; श्वान मालकावर गुन्हा दाखल

भटक्या श्वानांच्या हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Dadar) भटक्या श्वानांच्या हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता पाळीव श्वानाने चावा घेतल्याची मुंबईत दुसरी घटना घडली आहे. दादरमध्ये पाळीव श्वानाने 7 वर्षाच्या मुलाच्या हाताचा चावा घेतल्याची घटना घडली आहे.

दादर येथील गुलमोहर इमारतीच्या परिसरात शुक्रवारी रात्री 9.30 वाजता पाळीव श्वानाने 7 वर्षाच्या मुलाच्या हाताचा चावा घेतला. याप्रकरण डॉ. सुषमा सूर्यवंशी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून श्वान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आराध्य खेळत असताना गणेश चव्हाण यांचा ब्राऊनी नावाचा श्वान अचानक आराध्याच्या अंगावर धावून आला आणि त्याने मुलाच्या हाताचा चावा घेतल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • पाळीव श्वानाने चावा घेतल्याची मुंबईत दुसरी घटना

  • दादरमध्ये पाळीव श्वानाने 7 वर्षाच्या मुलाच्या हाताला घेतला चावा

  • श्वान मालकावर गुन्हा दाखल

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com