Mumbai
मुंबई
Mumbai : मुंबईसह उपनगरात उन्हाची झळ, तापमान 30–35 अंशांवर; थंडीचा कडाका कमी
थंडीचा कडाका आता कमी झाला असून उन्हाची झळ लागायला सुरूवात झाली आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Mumbai ) थंडीचा कडाका आता कमी झाला असून उन्हाची झळ लागायला सुरूवात झाली आहे. राज्यातील बहुतांश भागात थंडीचा कडाका कमी झाला असून गेल्या काही दिवसांत मुंबईसह उपनगरात तापमान 30 -35 अंश सेल्सियसपर्यंत पोहचले असल्याची माहिती मिळत आहे.
किमान तापमानात वाढ झाली असून वातावरणात बदल जाणवत आहे. सकाळी थंडावा जाणवत असून रात्रीच्यावेळी उकाडा जाणवत आहे. यासोबतच प्रदूषणात देखील वाढ होताना पाहायला मिळत आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता 252 वर पोहचली असल्याची माहिती मिळत असून कमाल तापमानात वाढ झाली आहे.
Summary
थंडीचा कडाका कमी,उन्हाच्या झळा सुरु
मुंबईसह उपनगरात तापमान 30 ते 35 अंशांवर
रात्रीच्या वेळीही उकाडा वाढला
