Supriya Sule Daughter : सुप्रिया सुळेंची मुलगी लवकर अडकणार लग्नबंधनात, भाजपच्या 'या' दोन नेत्यांची मध्यस्थी, कोण आहे सुळेंचा जावई?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांचा विवाह सारंग लखानी यांच्याशी ठरल्याची माहिती समोर आली आहे. ही आनंदाची बातमी सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर शेअर केली.
सारंग लखानी हे नागपूरचे रहिवासी असल्यामुळे रेवती सुळे आता नागपूरच्या सून होणार आहेत. राजकीय वर्तुळात चर्चेनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून हे नातं जुळलं असल्याचं सांगितलं जात आहे.
कोण आहेत सारंग लखानी?
सारंग लखानी हे नामांकित उद्योगपती अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. ते विश्वराज समूहात महत्त्वाची जबाबदारी सांभाळतात. व्यवसायासोबतच क्रीडा क्षेत्रातही त्यांची आवड असून ते कुशल बॅडमिंटन खेळाडू आहेत.
रेवती सुळे बद्दल थोडक्यात
रेवती सुळे यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्च शिक्षण घेतलं आहे. अलीकडेच झालेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत त्यांनी आई सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता.
थोडक्यात
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात
सारंग लखानी यांच्याशी विवाह निश्चित झाल्याची माहिती समोर
पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण
ही गोड बातमी सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर शेअर केली
राजकीय व सामाजिक वर्तुळात शुभेच्छांचा वर्षाव

