Raj Thackeray and Eknath Shinde Meet
राजकारण
Raj Thackeray and Eknath Shinde Meet : राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची भेट; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क
मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ‘नंदनवन’ या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली. शिंदे यांनी त्यांचे स्वागत करून सन्मान केला.
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हलचल निर्माण झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ‘नंदनवन’ या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली. शिंदे यांनी त्यांचे स्वागत करून सन्मान केला.
दोन्ही नेते काही काळ एकांतात चर्चा करत होते. या संवादात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर विचारविनिमय झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर त्यांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट ठरली आहे.
महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगवेगळे मैदानात उतरले होते. प्रचारादरम्यान टीका-टिप्पणीही झाली होती. त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. या भेटीतून नवे समीकरण तयार होणार का, की केवळ सौजन्यभेट होती? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

