Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती स्थिर, पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू
Sharad Pawar Health Update : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बारामतीत असताना त्रास जाणवल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली आणि पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्याला हलवण्यात आलं.
सध्या पवार यांना सर्दी, ताप, खोकला आणि श्वास घेण्यास अडचण जाणवत असल्याची माहिती आहे. रुग्णालयात त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून खबरदारी म्हणून भेटीगाठींवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यांच्यासोबत पत्नी आणि खासदार सुप्रिया सुळेही रुग्णालयात उपस्थित आहेत.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार पवार यांची प्रकृती स्थिर आहे. प्राथमिक तपासणीत हृदयाचे ठोके आणि ऑक्सिजन पातळी सामान्य आढळली असून केवळ श्वसनाचा वेग थोडा वाढलेला आहे. कोणतीही गंभीर बाब नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं असून पुढील उपचार अहवालानुसार ठरवले जाणार आहेत.
थोडक्यात
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडली.
त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्रास बारामतीत असताना जाणवला.
डॉक्टरांनी तपासणी केली आणि पुढील उपचारांसाठी पुण्याला हलवले.

