Rohit Pawar : शरद पवारांवर उपचार सुरू; रोहित पवारांकडून सर्वांना विनंती
Sharad Pawar Health Update : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कफ वाढल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास अडचण होत असून सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत.
या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी माहिती देताना सांगितलं की, प्राथमिक तपासण्या झाल्या असून पुढील अहवालानुसार उपचार ठरवले जातील. खबरदारी म्हणून पवार साहेबांना किमान एक ते दोन दिवस रुग्णालयात ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.
रोहित पवार यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या नेते आणि कार्यकर्त्यांना खास आवाहन केलं आहे की, कोणीही पुण्यात भेटीसाठी येऊ नये. रुग्णालयाचे नियम पाळणं आणि इतर रुग्णांची गैरसोय टाळणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, उपचार पुण्यातच होतील की पुढे मुंबईला हलवण्यात येईल, याचा निर्णय वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच घेतला जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
थोडक्यात
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत बिघडली.
त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कफामुळे श्वास घेण्यास त्रास होतोय.
सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
आमदार रोहित पवार यांनी प्राथमिक तपासण्या झाल्याची माहिती दिली.
पुढील अहवालानुसार पुढील उपचार ठरवले जातील.
पवार साहेबांना किमान १–२ दिवस रुग्णालयात ठेवण्याची शक्यता.

