, Sunetra Pawar, took charge today and had darshan of Siddhivinayak.
, Sunetra Pawar, took charge today and had darshan of Siddhivinayak.

Sunetra Pawar : राज्याच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आज आपला पदभार स्वीकारला घेतलं सिद्धीविनायकांचं दर्शन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आता जवळपास दोन आठवडे झाले आहेत. मुंबईहून बारामतीकडे जात असताना लँडिंगवेळी त्यांचं विमान कोसळलं आणि भीषण स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला.
Published by :
Riddhi Vanne
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आता जवळपास दोन आठवडे झाले आहेत. मुंबईहून बारामतीकडे जात असताना लँडिंगवेळी त्यांचं विमान कोसळलं आणि भीषण स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण राज्य हादरून गेलं. बारामतीमध्ये शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पवार कुटुंबासाठी हा धक्का पचवणं अत्यंत कठीण ठरलं. पत्नी सुनेत्रा पवार आणि कुटुंबीय अजूनही या दुःखातून सावरलेले नाहीत.

कर्तव्याला प्राधान्य

दुःख बाजूला ठेवत सुनेत्रा पवार यांनी मोठा निर्णय घेतला. पतीच्या निधनानंतर अवघ्या चार दिवसांत त्यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत त्यांची गटनेतेपदी निवड झाली आणि त्यानंतर राजभवनात शपथविधी पार पडला.

आज पदभार स्वीकारणार

शपथविधीला दहा दिवस उलटल्यानंतर आज त्या औपचारिकरित्या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांची पहिली उपस्थिती असेल. याशिवाय त्या पक्षाच्या मुख्यालयालाही भेट देणार आहेत.

महत्त्वाची जबाबदारी

सुनेत्रा पवार यांच्याकडे उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विभाग सोपवण्यात आले आहेत. पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे देण्यात आलं आहे.

आजचा कार्यक्रम

कार्यभार स्वीकारण्यापूर्वी त्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले तसेच दादरच्या चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. विधानभवनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून त्या मंत्रालयात कामाला केली आहे.

थोडक्यात

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आता जवळपास दोन आठवडे झाले आहेत.

  • मुंबईहून बारामतीकडे जात असताना लँडिंगवेळी त्यांचं विमान कोसळलं आणि भीषण स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला.

  • या घटनेनं संपूर्ण राज्य हादरून गेलं.

  • बारामतीमध्ये शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पवार कुटुंबासाठी हा धक्का पचवणं अत्यंत कठीण ठरलं.

  • पत्नी सुनेत्रा पवार आणि कुटुंबीय अजूनही या दुःखातून सावरलेले नाहीत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com