Rohit Pawar
Rohit Pawar

Rohit Pawar : अजित पवारांच्या विमानप्रवासाचा रोहित पवारांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले की....

Rohit Pawar on Praful Patel and Sunil Tatkare: अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर राज्यात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा अपघात होता की काही वेगळा प्रकार, यावर चर्चा सुरू आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Rohit Pawar on Praful Patel and Sunil Tatkare: अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर राज्यात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा अपघात होता की काही वेगळा प्रकार, यावर चर्चा सुरू आहे. आमदार रोहित पवार यांनी याबाबत पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, 27 जानेवारी रोजी घडलेल्या काही घटनांमुळेच प्रवासाची दिशा बदलली. कारने जाण्याचा पर्याय असताना अचानक विमानप्रवास ठरला. बैठकीला उशीर, काही महत्त्वाचे फोन आणि एका फाईलवरील तातडीची सही या सगळ्या गोष्टींची साखळी तपासली गेली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.

रोहित पवार यांनी काही नेत्यांची नावे घेत अप्रत्यक्ष संकेत दिले. एका सल्लागार कंपनीच्या करारावरून मतभेद होते, असा दावा त्यांनी केला. त्या बैठकीत वाद झाल्यानेच वेळ निघून गेला आणि शेवटी विमानाने जाण्याचा निर्णय झाला, असे ते म्हणाले. तसेच विमानातील ब्लॅक बॉक्सबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. जर तांत्रिक बाबींमध्ये त्रुटी आढळल्या तर संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. एकूणच, या घटनेभोवतीचे गूढ वाढत असून सत्य समोर यावे, हीच सर्वांची अपेक्षा आहे.

थोडक्यात

  • अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर राज्यात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

  • हा अपघात होता की काही वेगळा प्रकार, यावर चर्चा सुरू आहे.

  • आमदार रोहित पवार यांनी याबाबत पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

  • त्यांच्या म्हणण्यानुसार, 27 जानेवारी रोजी घडलेल्या काही घटनांमुळेच प्रवासाची दिशा बदलली.

  • कारने जाण्याचा पर्याय असताना अचानक विमानप्रवास ठरला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com