दिनविशेष 03 जूलै 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 03 जूलै 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

जूलै महिना सुरू झाला आहे, तर जूलै महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 03 July 2024 : सध्या जूलै महिना सुरू झाला आहे. तर जूलै महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 03 जूलै रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००६: एक्स. पी. १४ हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला.

२००१: सुधीर फडके - यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

२०००: विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात सागरी संग्रहालयात रूपांतर करण्यास मान्यता.

१९९८: कवी प्रदीप - यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

१९८८: अमेरिकेच्या नौदल सेन्याने इराण एअर फ्लाइट ६५५ हा विमानावर हल्ला केला. त्यात सर्व २९० प्रवासी लोकांचे निधन.

१९८८: फातिह सुलतान मेहमेत पूल, इस्तंबूल - हा युरोप आणि आशिया खंडांना जोडणारा दुसरा पूल तयार झाला.

१९५२: पोर्तो रिको - देशाच्या संविधानाला अमेरिकन कॉंग्रेसने मान्यता दिली.

१९५२: एसएस युनायटेड स्टेट्स - जहाज पाहल्या सफारी ला निघाले.

१९४४: दुसरे महायुद्ध - मिन्स्क आक्षेपार्ह शहरातून जर्मन सैन्याला पळवण्यात आले.

१९३८: मॅलार्ड हे वाफेचे इंजिन ताशी २०२ किमी वेगाने धावले. वाफेच्या इंजिनाचा विक्रम अजूनही अबाधित आहे.

१९२८: लंडन - मध्ये प्रथमतः रंगीत दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रक्षेपण झाले.

१८९०: अमेरिका - ओहायो हे अमेरिकेचे ४३ वे राज्य बनले.

१८८६: कार्ल बेन्झ - यांनी जगातील पहिली मोटारगाडी बनवली.

१८८४: डाऊ जोन्स (DJIA) - निर्देशांक सुरू झाला.

१८५५: भारत - कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.

१८५२: महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली.

१८५०: कोहिनूर हिरा - ईस्ट इंडिया कंपनीने भारतातून आणलेला हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.

आज यांचा जन्म

१९८७: प्रितेश ठाकूर - भारतीय समाजकारक

१९८०: हरभजन सिंग - भारतीय क्रिकेटपटू - पद्मश्री

१९७६: हेन्री ओलोंगा - झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू

१९७१: ज्युलियन असांज - विकीलीक्सचे संस्थापक

१९५२: रोहिनटन मिस्त्री - भारतीय कॅनेडियन लेखक

१९५२: अमित कुमार - भारतीय गायक

१९५१: सर रिचर्ड हॅडली - न्यूझीलंडचे क्रिकेट खेळाडू

१९५१: जीनक्लॉड डुवालियर - हैती देशाचे ४१वे राष्ट्राध्यक्ष (निधन: ४ ऑक्टोबर २०१४)

१९२६: सुनीता देशपांडे - लेखिका व स्वातंत्र्यसैनिक (निधन: ७ नोव्हेंबर २००९)

१९२४: सेल्लप्पन रामनाथन - सिंगापूरचे ६वे राष्ट्राध्यक्ष

१९२४: अर्जुन नायडू - भारतीय क्रिकेटपटू

१९१८: एस. व्ही. रंगा राव - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते (निधन: १८ जुलै १९७४)

१९१४: दत्तात्रय गणेश गोडसे - इतिहासकार, नाटककार व कलादिग्दर्शक (निधन: ५ जानेवारी १९९२)

१९१२: श्रीपाद गोविंद नेवरेकर - मराठी रंगभूमीवरील गायक-नट (निधन: १६ जून १९७७)

१९०९: भाऊसाहेब तारकुंडे - कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक (निधन: २२ मार्च २००४)

१८८६: गुरूदेव रानडे - आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत (निधन: ६ जून १९५७)

१८३८: मामा परमानंद - पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक (निधन: १३ सप्टेंबर १८९३)

१८२३: अहमद वेफिक पाशा - ऑट्टोमन साम्राज्याचे २४९वे ग्रँड वजीर, ग्रीक नाटककार आणि राजकारणी (निधन: २ एप्रिल १८९१)

१६८३: एडवर्ड यंग - इंग्लिश कवी

१६७६: लिओपोल्ड आय - अनहल्ट-देसाऊचे राजकुमार (निधन: ७ एप्रिल १७४७)

आज यांची पुण्यतिथी

२०२०: सरोज खान - हिंदी चित्रपटसृष्टीतील नृत्य कोरियोग्राफर - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: २२ नोव्हेंबर १९४८)

२०१५: योगेशकुमार सभरवाल - भारताचे ३६वे सरन्यायाधीश (जन्म: १४ जानेवारी १९४२)

२००४: अँड्रियन निकोलायेव - सोव्हियेत युनियनचे अंतराळवीर, मायक्रोग्रॅविटीमध्ये तरंगणारे पहिले व्यक्ती (जन्म: ५ सप्टेंबर १९२९)

१९९६: राजकुमार (जानी) - भारतीय चित्रपट अभिनेते (जन्म: ८ ऑक्टोबर १९२६)

१९६९: ब्रायन जोन्स - द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक (जन्म: २८ फेब्रुवारी १९४२)

१९३५: आंद्रे सीट्रोएन - सीट्रोएन कंपनीचे संस्थापक (जन्म: ५ फेब्रुवारी १८७८)

१३५०: संत नामदेव - भारतीय संत (जन्म: २९ ऑक्टोबर १२७०)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com