दिनविशेष 06 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 06 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 06 February 2024 : सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 06 फेब्रुवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९६८: फ्रांसमध्ये ग्रेनोबल येथे दहावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.

१९५९: जॅक किल्बी यांनी इंटिग्रेटेड सर्किटसाठी पहिला पेटंट घेतला.

१९५२: इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा)निधन झाले आणि एलिझाबेथ (दुसरी) गादीवर बसली.

१९४२: दुसरे महायुद्ध इंग्लंडने थायलँडविरुद्ध युद्ध पुकारले.

१९३२: प्रभातचा अयोध्येचा राजा हा बोलपट मुंबईच्या कृष्णा या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

१९३२: प्रभातचा अयोध्येचा राजा हा बोलपट मुंबईच्या कृष्णा या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

१९१८: ३० वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. १९२८ मध्ये हे वय २१ करण्यात आले.

१६८५: जेम्स (दुसरा) इंग्लंडचा राजा बनला.

आज यांचा जन्म

१९८३: श्रीशांत - क्रिकेटपटू

१९५२: डॉ. रिक चार्ल्सवर्थ - ऑस्ट्रेलियन हॉकीपटू, हॉकी प्रशिक्षक, क्रिकेटपटू आणि राजकारणी

१९४५: बॉब मार्ली - जमैकन संगीतकार (निधन: ११ मे १९८१)

१९१५: कवी प्रदीप - आधुनिक राष्ट्रकवी - दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: ११ डिसेंबर १९९८)

१९१२: एव्हा ब्राउन - ऍडोल्फ हिटलर यांची सोबतीण (निधन: ३० एप्रिल १९४५)

१९११: रोनाल्ड रेगन - अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष (निधन: ५ जून २००४)

१८९५: बेब रुथ - ५०० होम रन्स करणारे पहिले बेसबॉल खेळाडू (निधन: १६ ऑगस्ट १९४८)

१७४८: ऍडम वाईशप्त - इल्युमिनॅटिचे संस्थापक (निधन: १८ नोव्हेंबर १८३०)

आज यांची पुण्यतिथी

२०२३: बी. के. एस. वर्मा - भारतीय चित्रकार (जन्म: ५ सप्टेंबर १९४८)

२०२२: लता मंगेशकर - भारतीय जगप्रसिद्ध पार्श्वगायिका - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: २८ सप्टेंबर १९२९)

२००२: मॅक्स पेरुत्झ - ऑस्ट्रियन-इंग्रजी जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म: १९ मे १९१४)

२००१: बॅ. विठ्ठलराव गाडगीळ - केंद्रीय नभोवाणी मंत्री व काँग्रेसचे प्रवक्ते

१९९३: आर्थर एशे - विम्बल्डन, यूस ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारे पहिले कृष्णवर्णीय, अमेरिकन टेनिस खेळाडू (जन्म: १० जुलै १९४३)

१९७६: ऋत्विक घटक - भारतीय चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक (जन्म: ४ नोव्हेंबर १९२५)

१९५२: राजा जॉर्ज (सहावा) - इंग्लंडचा (जन्म: १४ डिसेंबर १८९५)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com