दिनविशेष 08 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 08 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 08 March 2024 : सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 08 मार्च या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०१६: पूर्ण घडलेले सूर्यग्रहण इंडोनेशिया आणि उत्तर पॅसिफिक मधून दिसले.

१९९३: दमानिया एअरवेज या खाजगी विमानवाहतुक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला स्पिरीट ऑफ जे. आर. डी. असे नाव देण्याचे ठरविले.

१९७९: फिलिप्स कंपनी ने प्रथमच सार्वजनिकरित्या कॉम्पॅक्ट डिस्कचे प्रकाशन केले.

१९७४: चार्ल्स डी गॉल विमानतळ पॅरिस, फ्रान्स मध्ये सुरु झाले.

१९५७: घाना देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९४८: फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.

१९४८: भारतीय विमानसेवा एअर इंडिया इंटरनॅशनल ने परदेशात आपली सेवा सुरु केली.

१९४२: दुसरे महायुद्ध - जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली.

१९११: पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.

१८१७: न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) ची स्थापना.

आज यांचा जन्म

१९७४: फरदीन खान - अभिनेते

१९६३: गुरु शरणसिंग - भारतीय क्रिकेटपटू

१९३१: मनोहारी सिंग - प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक (निधन: १३ जुलै २०१०)

१९३०: आरतीप्रभू - कवी, कादंबरीकार आणि नाटककार (निधन: २६ एप्रिल १९७६)

१९२८: वसंत अनंत कुंभोजकर - कथालेखक

१९२१: साहिर लुधियानवी - शायर व गीतकार (निधन: २५ ऑक्टोबर १९८०)

१८८६: एडवर्ड कालव्हिन केन्डॉल - जीवरसायन शास्रज्ञ

१८७९: ऑटो हान - जर्मन रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: २८ जुलै १९६८)

१८६४: हरी नारायण आपटे - भारतीय कादंबरीकार (निधन: ३ मार्च १९१९)

आज यांची पुण्यतिथी

२०१७: जॉर्ज अँड्र्यू ओलाह - हंगेरियन-अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म: २२ मे १९२७)

१९८८: अमर सिंग चमकिला - भारतीय गायक-गीतकार (जन्म: २१ जुलै १९६०)

१९८०: मॅक्स मिईदींगर - हेल्वेस्टिका फॉन्ट निर्माते (जन्म: २४ डिसेंबर १९१०)

१९५७: बाळासाहेब खेर - मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री - पद्म विभूषण (जन्म: २४ ऑगस्ट १८८८)

१९४२: जोस रॉल कॅपाब्लांका - क्यूबाचा बुद्धीबळपटू (जन्म: १९ नोव्हेंबर १८८८)

१७०२: विल्यम (तिसरा) - इंग्लंडचा राजा (जन्म: १४ नोव्हेंबर १६५०)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com