दिनविशेष 11 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 11 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 11 February 2024 : सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 11 फेब्रुवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

६६०: सम्राट जिम्मु यांनी जपानचे राष्ट्र निर्माण केले.

२०११: १८ दिवसांच्या जनआंदोलनानंतर होस् नी मुबारक यांना इजिप्तची सत्ता सोडणे भाग पडले.

१९९९: मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलियाराजा यांना जाहीर.

१९९०: २७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका.

१९७९: पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.

१९२९: पोप पायस (११ वा) आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झलेल्या लॅटेरान ट्रिटी या विशेष करारानुसार व्हॅटिकन सिटी हे शहर राष्ट्र इटालीतुन वेगळे करण्यात आले.

१९११: हेन्ऱ्या;री पिके याने हंटर जातीच्या विमानातून भारतातील पहिली एअर मेल अलाहाबादवरुन नैनी या १० किलोमीटर अंतरावरील गावाला वाहून नेली.

१८३०: मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.

१८२६: लंडन विद्यापीठाची स्थापना.

१८१८: इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.

१७५२: पेनसिल्व्हानिया हॉस्पिटल या अमेरिकेतील पहिल्या हॉस्पिटलचे बेंजामिन फ्रँकलिनच्या हस्ते उद्‌घाटन झाले.

१६६०: औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.

आज यांचा जन्म

१९४२: गौरी देशपांडे - कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री (निधन: १ मार्च २००३)

१९३७: बिल लॉरी - ऑस्ट्रेलियन क्रिकेटर

१९३२: रवी कोंडाला राव - भारतीय तेलगू अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक (निधन: २८ जुलै २०२०)

१९३१: गोपीचंद नारंग - भारतीय साहित्य समीक्षक - पद्म भूषण, पद्मश्री (निधन: १५ जून २०२२)

१८४७: थॉमस अल्वा एडिसन - विजेच्या दिव्याचे अमेरिकन संशोधक आणि उद्योजक (निधन: १८ ऑक्टोबर १९३१)

१८३९: अल्मोन स्ट्राउजर - अमेरिकन संशोधक (निधन: २६ मे १९०२)

१८००: हेन्री फॉक्स टॅलबॉट - छायाचित्रणकलेचा पाया घालणारे (निधन: १७ सप्टेंबर १८७७)

आज यांची पुण्यतिथी

१९९३: कमाल अमरोही - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक आणि कवी (जन्म: १७ जानेवारी १९१८)

१९९३: सईद अमीर हैदर कमाल नक्कवी - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी (जन्म: १७ जानेवारी १९१८)

१९७७: फक्रुद्दीन अली अहमद - भारताचे ५वे राष्ट्रपती (जन्म: १३ मे १९०५)

१९६८: दीनदयाळ उपाध्याय - तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते (जन्म: २५ सप्टेंबर १९१६)

१९४२: जमनालाल बजाज - भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com