दिनविशेष 12 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 12 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

जून महिना सुरू झाला आहे, तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 12 June 2024 : सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 12 जून रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०१४: इराकमधील तिक्रिट येथील कॅम्प स्पाइचरवर इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट यांच्या आतंकी हल्ल्यात १०९५ ते १७०० लोकांची हत्या. हा इतिहासातील २रा सगळ्यात भयावह आणि मोठा आतंकी हल्ला आहे.

२००१: कोनेरु हंपी - या बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनल्या. हा पराक्रम करणाऱ्या त्या भारतातील सर्वात कमी वयाच्या व एकुणात दुसऱ्या खेळाडू आहेत.

१९९६: एच. डी. देवेगौडा - यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.

१९९३: पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी.

१९९१: बोरिस येल्तसिन - यांची रशियाचे पहिले अध्यक्ष म्हणून लोकशाही पद्धतीने निवड.

१९९०: रशिया दिन - रशियन फेडरेशनच्या संसदेने औपचारिकपणे त्याचे सार्वभौमत्व घोषित केले.

१९७५: इंदिरा गांधी - अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.

१९६४: नेल्सन मंडेला - यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

१९४४: दुसरे महायुद्ध - ऑपरेशन ओव्हरलॉर्ड: अमेरिकन पॅराट्रूपर्सनी कॅरेंटन, नॉर्मंडी, फ्रान्स शहर सुरक्षित केले.

१९४३: होलोकॉस्ट - जर्मनीच्या सैन्याने पोलंडमधील ब्रझेझनी येथील ज्यू वस्ती नष्ट केली. सुमारे ११८० ज्यूं लोकांची हत्या करण्यात आली.

१९४२: ऍन फ्रॅंक - यांना तेराव्या वाढदिवसासाठी एक डायरी मिळाली.

१९४०: दुसरे महायुद्ध - १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.

१९४०: दुसरे महायुद्ध - १३ हजार ब्रिटीश आणि फ्रेंच सैन्याने मेजर जनरल एर्विन रोमेल यांच्याकडे आत्मसमर्पण केले.

१९३५: चाको युद्ध - बोलिव्हिया आणि पॅराग्वे यांच्यात युद्धबंदीची वाटाघाटी झाली.

१९०५: भारत सेवक समाजाची (Servants of India Society) - स्थापना झाली.

१८९८: फिलिपाइन्स - देशाने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.

१८९६: जे.टी. हर्न - प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारे पहिले खेळाडू बनले.

आज यांचा जन्म

१९८५: ब्लॅक रॉस - मोझीला फायरफॉक्स (mozila firefox) ब्राऊसरचे सहसंस्थापक

१९८२: शैलजा पुजारी - भारतीय वेटलिफ्टर - कॉमनवेल्थ गेम्स सुवर्ण पदक

१९५७: जावेद मियाँदाद - पाकिस्तानी क्रिकेटपटू

१९५७: गीतांजली श्री - हिंदी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक - आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार

१९३९: ओबेदुल्ला अलीम - भारतीय-पाकिस्तानी कवी आणि लेखक (निधन: १८ मे २००३)

१९२९: ऍना फ्रँक - जर्मन छळछावणीत मरण पावलेली मुलगी

१९२४: जॉर्ज बुश - अमेरिकेचे ४१ वे राष्ट्राध्यक्ष

१९१७: भालचंद्र दत्तात्रय खेर - लेखक व पत्रकार (निधन: २१ जून २०१२)

१८९४: पुरुषोत्तम बापट - भारतीय बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक (निधन: ४ नोव्हेंबर १९९१)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: डी फिलिप - चित्रपट अभिनेते आणि नाटक कलाकार

२०२०: आनंद मोहन झुत्शी गुलजार देहलावी - उर्दू कवी, अभ्यासक आणि पत्रकार (जन्म: ७ जुलै १९२६)

२०२०: पारसनाथ यादव - भारतीय राजकारणी (जन्म: १२ जानेवारी १९४९)

२०१५: नेकचंद सैनी - भारतीय मूर्तिकार - पद्मश्री (जन्म: १५ डिसेंबर १९२४)

२०१२: एलिनॉर ऑस्ट्रॉम - अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म: ७ ऑगस्ट १९३३)

२००३: ग्रेगरी पेक - हॉलीवूड अभिनेते (जन्म: ५ एप्रिल १९१६)

२०००: पु. ल. देशपांडे - भारतीय मराठी विनोदी लेखक - पद्म भूषण (जन्म: ८ नोव्हेंबर १९१९)

१९८३: नॉर्मा शिअरर - कॅनेडियन अमेरिकन अभिनेत्री (जन्म: १० ऑगस्ट १९०२)

१९८१: पी. बी. गजेंद्रगडकर - भारताचे ७वे सरन्यायाधीश - पद्म विभूषण (जन्म: १६ मार्च १९०१)

१९७८: गुओ मोरुओ - चिनी कवी, लेखक आणि इतिहासकार

१९७६: गोपीनाथ कविराज - भारतीय संस्कृत विद्वान - पद्म विभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: ७ सप्टेंबर १८८७)

१९७२: दीनानाथ गोपाळ तेंडुलकर - भारतीय लेखक (जन्म: - )

१९६४: कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी - लेखक व मराठी भाषातज्ञ (जन्म: ५ जानेवारी १८९२)

१९१२: फ्रेडरिक पासी - फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म: २० मे १८२२)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com