दिनविशेष 16 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 16 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मे महिना सुरू झाला आहे, तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 16 May 2024 : सध्या मे महिना सुरू झाला आहे. तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 16 मे रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००७: निकोलाय सारकॉझी - फ्रान्स देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले.

२००५: कुवेत - देशात स्त्रियांना प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त झाला.

२०००: बॅडमिंटन - अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी तसेच खेळांचे दूरचित्रवाणी प्रसारण सुलभ करण्यासाठी या खेळातील गेम १५ ऐवजी ७ गुणांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

१९९६: अटलबिहारी वाजपेयी - भारताचे १०वे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी सूत्रे हाती घेतली.

१९९३: बचेन्द्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह अठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला व नवा जागतिक विक्रम नोंदविला.

१९७५: जुंको तबेई - माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला बनल्या.

१९६९: रशिया - देशाचे व्हेनेरा-५ हे मानवविरहित अंतराळयान शुक्र ग्रहावर उतरले.

१९२९: ऑस्कर - हॉलिवूडच्या ऍकेडमी ऑफ मोशन पिक्चर, आर्ट्‌स अँड सायन्सेस या संस्थेतर्फे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ऑस्कर असे नाव पडले.

१८९९: बाळकृष्ण चाफेकर - क्रांतिकारक यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.

१८६६: अमेरिका - देशात पाच सेन्ट किंवा निकेल हे नाणे व्यवहारात आले.

१७३९: वसईची लढाई - मराठ्यांनी पोर्तुगीज सैन्याचा पराभव केल्याने लढाई संपली.

१६६५: पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाने घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्न करताना मुरारबाजी यांचे निधन.

आज यांचा जन्म

१९७०: गॅब्रिएला सॅबातिनी - अर्जेंटिनाच्या टेनिस खेळाडू

१९५०: जॉर्ज बेडनोर्झ - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक

१९४७: वरिंदर सिंग - भारतीय फील्ड हॉकी खेळाडू - ऑलिम्पिक कांस्यपदक, ध्यानचंद खेलरत्न (निधन: २८ जून २०२२)

१९३१: के. नटवर सिंह - भारतीय राजकारणी आणि परराष्ट्रमंत्री

१९२६: माणिक वर्मा - गायिका (निधन: १० नोव्हेंबर १९९६)

१९२३: मेर्टन मिलर - अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: ३ जून २००२)

१९०५: हेन्री फोंडा - अमेरिकन अभिनेते (निधन: १२ ऑगस्ट १९८२)

१८५०: एग्स्टे डिटर - अल्झायमरच्या आजाराने निदान झालेल्या पहिल्या व्यक्ती (निधन: ८ एप्रिल १९०६)

१८३१: डेव्हिड एडवर्ड ह्यूजेस - मायक्रोफोनचे सहसंशोधक (निधन: २२ जानेवारी १९००)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: हुसेन दलवाई - भारतीय राजकारणी, खासदार आणि महाराष्ट्राचे खासदार (जन्म: १६ फेब्रुवारी १९४३)

२०२२: चेतना राज - भारतीय अभिनेत्री

२०१४: रुसी मोदी - टाटा स्टील कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (जन्म: १७ जानेवारी १९१८)

२०१३: हेनरिक रोहरर - स्विस भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म: ६ जून १९३३)

२००८: रॉबर्ट मोन्डवी - ओपस वन व्हाइनरीचे सहसंस्थापक (जन्म: १८ जून १९१३)

१९९४: फणी मुजुमदार - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक (जन्म: २८ डिसेंबर १९११)

१९९४: माधव मनोहर - साहित्य समीक्षक

१९९०: जिम हेनसन - द मपेट्सचे जनक (जन्म: २४ सप्टेंबर १९३६)

१९७७: मादीबो केएटा - माली देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म: ४ जून १९१५)

१९५०: अण्णासाहेब लठ्ठे - कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री (जन्म: ९ डिसेंबर १८७८)

१९४७: फ्रेडरिक गौलँड हॉपकिन्स - इंग्रजी बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म: २० जून १८६१)

१९३८: जोसेफ स्ट्रॉस - अमेरिकन अभियंते, गोल्डन गेट ब्रिजचे सह-रचनाकार (जन्म: ९ जानेवारी १८७०)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com