2 July 2023 Dinvishesh
2 July 2023 DinvisheshTeam Lokshahi

2 July 2023 Dinvishesh : देशात डिजिटल इंडियाची सुरूवात, जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

2 July 2023 Dinvishesh : सध्या जुलै महिना सुरू झाला आहे. तर जुलै महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत....
Published by :
Sagar Pradhan

Dinvishesh 2 July 2023 : सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 2 जुलै या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं

२०१३: इंटरनॅशनल एस्ट्रॉनॉमिकल युनियन - प्लूटोच्या चौथ्या आणि पाचव्या चंद्रांना, कर्बेरोस आणि स्टिक्स अशी नावे देण्यात आली.

२००२: स्टीव्ह फॉसेट - फुगा आणि स्थिर पंख असलेल्या विमानात जगभर एकट्याने न थांबता उड्डाण करणारे पहिले व्यक्ती बनले.

२००१: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील मोठा बौध्द स्तूप सापडला.

२००१: पहिले कृत्रिम हृदय प्रत्यारोपण - एबीओकोर हे स्वयंपूर्ण कृतिर्म हृदय पहिल्यांदा प्रत्यारोपण करण्यात आले.

१९९७: १९९७चे आशियाई आर्थिक संकट - सुरवात.

१९९४: जगदीश स्वामिनाथन - चित्रकार यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड करण्यात आली.

१९९०: १९९० ची मक्का दुर्घटना - किमान १४०० मुस्लिम यात्रेकरू मक्का शंकराकडे जाणाऱ्या बोगद्यामध्ये अडकवून त्यांचे गुदमरून निधन.

१९८६: चिली - देशात जनरल ऑगस्टो पिनोशेच्या हुकूमशाहीच्या विरोधात चालू असणाऱ्या निदर्शनादरम्यान रॉड्रिगो रोजास आणि कारमेन ग्लोरिया क्विंटाना यांना जिवंत जाळण्यात आले.

१९८३: कल्पक्कम,तामिळनाडू येथील अणुऊर्जा केंद्र सुरू झाले.

१९७६: व्हिएतनाम - देशात समाजवादी प्रजासत्ताक तयार झाले.

१९७२: सिमला करारा - भारत आणि पाकिस्तान मध्ये हा करार झाला.

१९६६: फ्रान्स - देशाने पहिली अण्वस्त्र चाचणी केली.

१९६४: नागरी हक्क चळवळ, अमेरिका - अध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी१९६४ च्या नागरी हक्क कायद्यावर स्वाक्षरी केली.

१९६२: वॉल मार्ट स्टोअर - अमेरिकेत येथे पहिले वॉल मार्ट स्टोअर उघडले.

१९४०: नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.

१९४०: एसएस अरंडोरा स्टार जहाज दुर्घटना - हे जहाज उत्तर अटलांटिकमध्ये बुडाले, त्यात किमान ८०० नागरिकाचे निधन.

१९३७: अमेलिया इअरहार्ट आणि नेव्हिगेटर फ्रेड नूनन यांचा विषुववृत्तीय जग परिक्रमा करत असताना संपर्क तुटला.

१९२१: पहिले महायुद्ध - नॉक्स-पोर्टर ठराव: अमेरिका आणि जर्मनी यांच्यातील युद्ध औपचारिकपणे समाप्त.

१८६५: साल्व्हेशन आर्मी - संस्थेची स्थापना झाली.

१८५०: बेंजामिन लेन - यांना गॅस मास्कचे पेटंट मिळाले.

१६९८: थॉमस सावेरी - यांनी पहिले स्टीम इंजिनचे पेटंट मिळवले.

आज यांचा जन्म

१९५८: पवन मल्होत्रा - भारतीय अभिनेते

१९४१: आशालता वाबगावकर - भारतीय चित्रपट अभिनेत्री (निधन: २२ सप्टेंबर २०२०)

१९३०: कार्लोस मेनेम - अर्जेंटिनाचे ५० वे राष्ट्राध्यक्ष

१९३०: ओ. व्ही. विजयन - भारतीय लेखक आणि चित्रकार (निधन: ३० मार्च २००५)

१९२६: विनायक आदिनाथ बुवा - विनोदी लेखक

१९२५: पॅट्रिक लुमूंबा - काँगोचे पहिले पंतप्रधान (निधन: १७ जानेवारी १९६१)

१९२३: जवाहरलालजी दर्डा - लोकमतचे संस्थापक, संपादक वव स्वातंत्र्य सेनानी

१९२२: पिअर कार्डिन - फ्रेन्च फॅशन डिझायनर

१९१८: इंदुमती भट्टाचार्य - भारतीय राजकारणी, खासदार (निधन: २० एप्रिल १९९०)

१९०६: बेटे हान्स आल्ब्रेख्ट - अमेरिकन भौतिकीतज्ञ - नोबल पुरस्कार

१९०४: रेने लॅकॉस्ता - फ्रेंच लॉन टेनिस खेळाडू, पोलो टी शर्टचे जनक (निधन: १२ ऑक्टोबर १९९६)

१८८०: गणपतराव बोडस - श्रेष्ठ गायक आणि नट (निधन: २३ डिसेंबर १९६५)

१८७७: हेर्मान हेस - जर्मन लेखक - नोबेल पुरस्कार

१८६२: विल्यम हेन्री ब्रॅग - इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार

आज यांची पुण्यतिथी

२०१८: ऍडमिरल जयंत नाडकर्णी - भारताचे १४वे नौसेनाप्रमुख - परम विशिष्ट सेवा पदक (जन्म: ५ डिसेंबर १९३१)

२०१३: डगलस एंगलबर्ट - कॉम्पुटर माउसचे शोधक (जन्म: ३० जानेवारी १९२५)

२०११: चतुरनन मिश्रा - कम्युनिस्ट नेते (जन्म: ७ एप्रिल १९२५)

२००७: दिलीप सरदेसाई - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: ८ ऑगस्ट १९४०)

१९९९: मारिओ पुझो - अमेरिकन लेखक (जन्म: १५ ऑक्टोबर १९२०)

१९६१: अर्नेस्ट हेमिंग्वे - अमेरिकन लेखक - नोबेल पुरस्कार (जन्म: २१ जुलै १८९९)

१९५०: युसूफ मेहेर अली - समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक (जन्म: २३ सप्टेंबर १९०३)

१८४३: डॉ. सॅम्यूअल हानेमान - होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक (जन्म: १० एप्रिल १७५५)

१७७८: रुसो - फ्रेंच विचारवंत, लेखक संगीतकार (जन्म: २८ जून १७१२)

१५६६: नाॅस्टाॅडॅमस - जगप्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता (जन्म: १४ डिसेंबर १५०३)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com