Dinvishesh
DinvisheshTeam Lokshahi

आज काय घडले : पहिल्या मराठी व्यक्तीने सर केला एव्हरेस्ट

माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा जन्म, अभिनेत्री रीमा लागू यांचे निधन
Published by :
Team Lokshahi

पुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले. एव्हरेस्ट सर करणारे ते पहिले मराठी व्यक्ती आहेत.

सुविचार

छोटंसं आयुष्य आहे, ते त्या लोकांसोबत घालवा; जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात.

Dinvishesh
आज काय घडले : जगातील सर्वात मोठा शेअर बाजार सुरु

आज काय घडले

  • १९७२ मध्ये दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. त्यानंतर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असे त्याचे नामांतर झाले.

  • १९९८ मध्ये पुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले. एव्हरेस्ट सर करणारे ते पहिले मराठी व्यक्ती आहेत.

  • २०१५ मध्ये मुंबईच्या केईएम हॉस्पिलमध्ये नर्स असलेल्या अरुणा शानबाग यांचे निधन झाले. त्या ४२ वर्ष अर्धमरण अवस्थेत होत्या. अखेरी त्यांचे न्यूमोनियाने निधन झाले. त्यांना इच्छामरण देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने २०११ मध्ये फेटाळली होती.

आज यांचा जन्म

  • भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा छत्रपती शाहूराजे भोसले यांचा १६८२ मध्ये जन्म झाला.

  • गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते पुरुषोत्तम काकोडकर यांचा १९१३ मध्ये जन्म झाला.

  • पोप पायस नवव्यानंतर सर्वाधिक काळ पोप पदावर राहणारे पोप जॉन पॉल (दुसरा) यांचा १९२० मध्ये जन्म झाला. ते एकमेव स्लाव्ह वंशीय पोप आहेत.

  • भारताचे माजी पंतप्रधान हरदनहळ्ळी देवेगौडा यांचा १९३३ मध्ये जन्म झाला. जून १९९६ ते एप्रिल १९९७ ह्या १० महिन्यांच्या कालावधीत ते पंतप्रधान होते.

आज यांची पुण्यतिथी

  • मराठी भाषेतील आद्य पत्रकार बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचे १८४६ मध्ये निधन झाले. त्यांना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या दहा भाषांचे ज्ञान होते.

  • वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचे १९६६ मध्ये निधन झाले. त्यांचे ३०० पेक्षा जास्त शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत.

  • भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचे १९९७ मध्ये निधन झाले.

  • भारतीय धार्मिक नेते जय गुरूदेव यांचे २०१२ मध्ये निधन झाले.

  • भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचे २०१७ मध्ये निधन झाले. सुमारे चार दशक त्यांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com