दिनविशेष 21 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 21 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मे महिना सुरू झाला आहे, तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 21 May 2024 : सध्या मे महिना सुरू झाला आहे. तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 21 मे रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९९६: माधवराव पाटील - ब्रिटन मधील इलिंग शहराचे महापौर झाले.

१९९४: सुश्मिता सेन - यांना ४३ व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस युनिव्हर्स किताब प्रदान. हा किताब मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहे.

१९९२: चीन - देशाने १,००० किलो टन क्षमतेच्या अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुस्फोट आहे.

१९९१: राजीव गांधी - भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबदुर, तमिळ नाडू येथे आत्मघातकी आतंकवाद्यांनी हत्या केली.

१९३२: अमेलिया इअरहार्ट - अटलांटिक महासागर एकटयाने पार करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.

१९०४: फेड्रेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (फिफा) - पॅरिसमध्ये सुरवात.

१८८१: रेड क्रॉस सोसायटी - अमेरिकन रेड क्रॉस सोसायटीची वॉशिंग्टन (डी. सी.) येथे स्थापना झाली.

आज यांचा जन्म

१९७०: रमेश लटके - भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार (निधन: ११ मे २०२२)

१९६०: मोहनलाल - दक्षिण भारतीय अभिनेते

१९५८: नइम खान - भारतीय-अमेरिकन फॅशन डिझायनर

१९३१: शरद जोशी - हिंदी कवी, लेखक व उपहासकार (निधन: ५ सप्टेंबर १९९१)

१९२८: ज्ञानेश्वर नाडकर्णी - कला समीक्षक व लेखक (निधन: २३ डिसेंबर २०१०)

१९२३: अर्मांड बोरेल - स्विस गणितज्ञ (निधन: ११ ऑगस्ट २००३)

१९२२: गोकुलानंद महापात्रा - भारतीय लेखक आणि शैक्षणिक (निधन: १० जुलै २०१३)

१९२१: प्रभात रंजन सरकार - भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक (निधन: २१ ऑक्टोबर १९९०)

१९१६: हेरॉल्ड रॉबिन्स - अमेरिकन कादंबरीकार (निधन: १४ ऑक्टोबर १९९७)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: तोता सिंग - भारतीय राजकारणी, पंजाबचे आमदार (जन्म: २ मार्च १९१४)

२०००: मार्क आर. ह्यूजेस - हर्बालाइफ कंपनीचे स्थापक (जन्म: १ जानेवारी १९५६)

१९९८: आबासाहेब बाबूराव किल्लेदार - इंटकचे सोलापुरातील नेते

१९९१: राजीव गांधी - भारताचे ६वे पंतप्रधान (जन्म: २० ऑगस्ट १९४४)

१९७९: जानकीदेवी बजाज - भारतीय स्वातंत्र्य वीरांगना (जन्म: ७ जानेवारी १८९३)

१६८६: ऑटो व्हॉन गॅरिक - जर्मन पदार्थवैज्ञानिक (जन्म: ३० नोव्हेंबर १६०२)

१४७१: हेन्री (सहावा) - इंग्लंडचा राजा (जन्म: ६ डिसेंबर १४२१)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com