दिनविशेष 22 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 22 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

एप्रिल महिना सुरू झाला आहे, तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 22 April 2024 : सध्या एप्रिल महिना सुरू झाला आहे. तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 22 एप्रिल रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९९७: राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ओमप्रकाश भसीन पुरस्कार जाहीर करण्यात आला.

१९७७: टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी प्रथम ऑप्टिकल फाइबरचा वापर केला गेला.

१९७०: पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.

१९४८: अरब-इस्त्रायल युद्ध - अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.

१०५६: क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट झाला.

आज यांचा जन्म

१९४५: गोपाळकृष्ण गांधी - भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी

१९४४: स्टीव्ह फॉसेट - अमेरिकन वैमानिक, ग्लोबल फायर या फुग्यातून पॅसिफिक महासागर एकट्याने उड्डाण करून न थांबता ओलांडणारे पहिले व्यक्ती (निधन: ३ सप्टेंबर २००७)

१९२९: अशोक केळकर - भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक - पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: २० सप्टेंबर २०१४)

१९२९: उषा किरण - चित्रपट अभिनेत्री (निधन: ९ मार्च २०००)

१९१६: कानन देवी - भारतीय अभिनेत्री आणि गायिका (निधन: १७ जुलै १९९२)

१८७०: व्लादिमिर लेनिन - रशियन क्रांतिकारक (निधन: २१ जानेवारी १९२४)

१८५४: हेन्री ला फॉन्टेन, - बेल्जियन वकील आणि लेखक - नोबेल पारितोषिक (निधन: १४ मे १९४३)

१८१२: जेम्स ऍॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे डलहौसी - भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड (निधन: १९ डिसेंबर १८६०)

१६९८: सत्पुरुष शिवदिननाथ - नाथपरंपरेतील एका शाखेचे प्रमुख

आज यांची पुण्यतिथी

२०१३: जगदीश शरण वर्मा - भारताचे २७वे सरन्यायाधीश (जन्म: १८ जानेवारी १९३३)

२०१३: लालगुडी जयरामन - व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक - पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: १७ सप्टेंबर १९३०)

२००३: बळवंत गार्गी - पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार व लघुकथाकार (जन्म: ४ डिसेंबर १९१६)

१९९४: रिचर्ड निक्सन - अमेरिकेचे ३७वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ९ जानेवारी १९१३)

१९८४: अँसेल ऍडम्स - अमेरिकन लँडस्केप छायाचित्रकार (जन्म: २० फेब्रुवारी १९०२)

१९३३: हेन्री रॉयस - रोल्स-रॉयस लिमिटेडचे सहसंस्थापक (जन्म: २७ मार्च १८६३)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com