दिनविशेष 24 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 24 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मे महिना सुरू झाला आहे, तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 24 May 2024 : सध्या मे महिना सुरू झाला आहे. तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 24 मे रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०१९: सुरत, गुजरात - मध्ये लागलेल्या आगीत २२ विद्यार्थ्यांचे निधन.

२००१: शेर्पा तेब्बा त्रेथी - १८ व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शीखर सर करणारा सर्वात लहान व्यक्ती ठरला.

२०००: भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) - इन्सॅट-३बी हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.

१९९४: वर्ल्ड ट्रेड सेंटर, न्यूयॉर्क - २६ फेब्रुवारी १९९३ रोजी न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या चार मुस्लीम दहशतवाद्यांना प्रत्येकी २४० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

१९९१: एरिट्रिया - देशाला इथिओपियाकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९७६: काँकॉर्ड विमान - या ध्वनीपेक्षा अधिक वेगाने उडणाऱ्या विमानाची लंडन ते न्यूयॉर्क अशी सेवा सुरू झाली.

१९४०: इगोर सिकोरसकी - यांनी एका-रोटर हेलिकॉप्टरचे यशस्वी उड्डाण केले.

१९०६: रिट्झ हॉटेल, लंडन - सुरवात.

१८८३: ब्रूकलिन ब्रिज, न्यूयॉर्क - वाहतुकीसाठी खुला झाला.

१८४४: सॅम्युअल मोर्स - यांनी स्वत:विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश पाठवला.

१६२६: पीटर मिन्युईट - यांनी स्थानिक लोकांकडून मॅनहटन बेट २४ डॉलरला विकत घेतले.

आज यांचा जन्म

१९७७: जीत गांगुली - भारतीय संगीतकार, संगीत दिग्दर्शक आणि गायक

१९७३: शिरीष कुंदर - भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक

१९६९: मंदार आगाशे - भारतीय संगीत दिग्दर्शक आणि उद्योगपती

१९५५: राजेश रोशन - संगीतकार

१९४१: बॉब डायलन - अमेरिकन गायक-गीतकार आणि निर्माते - नोबेल पारितोषिक

१९४०: जोसेफ ब्रॉडस्की - रशियन-अमेरिकन कवी आणि निबंधकार - नोबेल पारितोषिक (निधन: २८ मे १९९६)

१९३३: हेमचंद्र दाणी - रणजी व कसोटी क्रिकेटपटू (निधन: १९ डिसेंबर १९९९)

१९२४: जादूगार रघुवीर - भारतीय जादूगार (निधन: २० ऑगस्ट १९८४)

१९०५: मिखाईल शोलोखोव्ह - रशियन कादंबरीकार आणि लेखक - नोबेल पारितोषिक (निधन: २१ फेब्रुवारी १९८४)

१८१९: राणी व्हिक्टोरिया - ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य करणाऱ्या राणी (निधन: २२ जानेवारी १९०१)

१७५१: चार्ल्स इमॅन्युएल IV - सार्डिनियाचे राजा (निधन: ६ ऑक्टोबर १८१९)

१६८६: डॅनियल फॅरनहाइट - फॅरेनहाइट स्केल विकसित करणारे जर्मन शास्त्रज्ञ (निधन: १६ सप्टेंबर १७३६)

आज यांची पुण्यतिथी

२०११: हकीम अली झरदारी - भारतीय-पाकिस्तानी व्यापारी आणि राजकारणी (जन्म: ९ डिसेंबर १९३१)

२०००: मजरुह सुलतानपुरी - शायर, गीतकार आणि कवी - दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: १ ऑक्टोबर १९१९)

१९८४: विन्स मॅकमोहन सिनियर - डब्ल्यूडब्ल्यूई (WWE)चे संस्थापक (जन्म: ६ जुलै १९१४)

१९५०: आर्चिबाल्ड वावेल - भारताचे ४३वे गर्वनर जनरल (जन्म: ५ मे १८८३)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com