दिनविशेष 26 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 26 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

एप्रिल महिना सुरू झाला आहे, तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 26 April 2024 : सध्या एप्रिल महिना सुरू झाला आहे. तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 26 एप्रिल रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००५: आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे सीरीयाने लेबाननमधुन सैन्य काढुन घेतले.

१९९५: आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहोताने इंटरनॅशनल वुमन मास्टर किताब मिळवला.

१९८९: बांगलादेशमधे चक्रीवादळामुले सुमारे १,३०० लोक ठार, १२,००० जखमी आणि ८०,००० बेघर झाले.

१९८६: रशियातीलचेर्नोबिल येथील अणुभट्टीत भीषण स्फोट होऊन किरणोत्सारी पदार्थ वातावरणात फेकले गेले.

१९७३: अजित नाथ रे भारताचे १४ वे सरन्यायाधीश झाले.

आज यांचा जन्म

१९४८: मौशमी चटर्जी - अभिनेत्री

१९४२: इफ्तिकार हुसैन अन्सारी - भारतीय राजकारणी, मौलवी (निधन: ३० सप्टेंबर २०१४)

१९३२: मायकेल स्मिथ - इंग्रजी-कॅनेडियन बायोकेमिस्ट आणि अनुवंशशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: ४ ऑक्टोबर २०००)

१९०८: सर्वमित्र सिकरी - १३वे सरन्यायाधीश (निधन: २४ सप्टेंबर १९९२)

१९००: चार्ल्स रिच्टर - अमेरिकन भूवैज्ञानिक (निधन: ३० सप्टेंबर १९८५)

१८४७: हंस ऑअर - स्विस-ऑस्ट्रियन वास्तुविशारद, स्वित्झर्लंडच्या फेडरल पॅलेसचे रचनाकार (निधन: ३० ऑगस्ट १९०६)

आज यांची पुण्यतिथी

१९९९: मनमोहन अधिकारी - लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते (जन्म: २० जून १९२०)

१९८७: शंकरसिंग रघुवंशी - शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार (जन्म: ५ ऑक्टोबर १९२२)

१९७६: आरतीप्रभू - कवी, कादंबरीकार आणि नाटककार (जन्म: ८ मार्च १९३०)

१९२०: श्रीनिवास रामानुजन - भारतीय गणिती (जन्म: २२ डिसेंबर १८८७)

१७४८: मुहम्मद शाह - भारतातील मुघल सम्राट (जन्म: ७ ऑगस्ट १७०२)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com