दिनविशेष 26 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 26 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मार्च महिना सुरू झाला आहे, तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 26 March 2024 : सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 26 मार्च रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०१३: त्रिपूरा उच्च न्यायालयाची स्थापना.

२०००: ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

१९७९: अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.) येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या.

१९७४: गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलनाची सुरूवात.

१९७२: नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.

१९४२: इंदिरा नेहरू व फिरोझ गांधी यांचा विवाह.

१९१०: लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली.

१९०२: नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखलेमध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले.

१५५२: गुरू अमर दास शीखांचे तिसरे गुरू बनले.

आज यांचा जन्म

१९८५: प्रॉस्पर उत्सेया - झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू

१९३३: कुबेर नाथ राय - भारतीय कवि आणि विद्वान आचार्य (निधन: ५ जून १९९६)

१९३०: सँड्रा डे ओ'कॉनर - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती

१९१६: ख्रिश्चन बी. अँफिनसेन - अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: १४ मे १९९५)

१९०९: बाळकृष्ण सातोस्कर - साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतकचे पहिले संपादक (निधन: २७ नोव्हेंबर २०००)

१९०७: महादेवी वर्मा - हिंदी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ - पद्म विभूषण, पद्म भूषण, ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ११ सप्टेंबर १९८७)

१८८१: गुच्चिओ गुच्ची - गुच्ची फॅशन कंपनीचे निर्माते (निधन: २ जानेवारी १९५३)

१८७९: ओथमर अम्मांन - जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजचे रचनाकार (निधन: २२ सप्टेंबर १९६५)

१८७४: रॉबर्ट फ्रॉस्ट - अमेरिकन कवी (निधन: २९ जानेवारी १९६३)

आज यांची पुण्यतिथी

२०१२: माणिक गोडघाटे - आधुनिक मराठी कवी ग्रेस तथा (जन्म: १० मे १९३७)

२००९: ग्रिसेल्डा अल्वारेझ - मेक्सिको राज्याच्या पहिल्या महिला गव्हर्नर (जन्म: ५ एप्रिल १९१३)

२००८: बाबूराव बागूल - दलित साहित्यिक (जन्म: १७ जुलै १९३०)

२००३: हरेन पंड्या - गुजरातचे मंत्री (जन्म: २७ ऑगस्ट १९६१)

१९९९: आनंद शंकर - प्रयोगशील संगीतकार (जन्म: ११ डिसेंबर १९४२)

१९९७: नवलमल फिरोदिया - गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती (जन्म: ९ सप्टेंबर १९१०)

१९९६: डेव्हिड पॅकार्ड - ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक (जन्म: ७ सप्टेंबर १९१२)

१९९६: के. के. हेब्बर - चित्रकार

१९४५: डेव्हिड लॉईड जॉर्ज - युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान (जन्म: १७ जानेवारी १८६३)

१९३२: हेन्री एम. लेलंड - कॅडिलॅक आणि लिंकन कंपनीचे संस्थापक (जन्म: १६ फेब्रुवारी १८४३)

१८८५: अंसन स्तागेर - वेस्टर्न युनियनचे सहसंस्थापक (जन्म: २० एप्रिल १८२५)

१८२७: लुडविग व्हान बीथोव्हेन - कर्णबधिर संगीतकार (जन्म: १६ डिसेंबर १७७०)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com