दिनविशेष 27 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 27 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मे महिना सुरू झाला आहे, तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 27 May 2024 : सध्या मे महिना सुरू झाला आहे. तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 27 मे रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: भारतातील लडाखमध्ये २६ सैनिकांना घेऊन जाणारे वाहन श्योक नदीत कोसळले आणि त्यात ७ सैनिकांचे निधन.

२०१६: हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क - आणि हिबाकुशाला भेट देणारे बराक ओबामा अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती आहेत.

१९९९: अमेरिकेचे डिस्कव्हरी हे अंतराळयान नव्या अंतराळस्थानकाकडे झेपावले.

१९९८: ग्रँड प्रिन्सेस - या जगातल्या (त्याकाळच्या) सर्वात मोठ्या व सर्वात महागड्या जहाजाने आपल्या पहिल्या सफरीला सुरुवात केली.

१९५१: तारापोरवाला मत्स्यालय, मुंबई - सुरू झाले.

१९४१: दुसरे महायुद्ध - अमेरिका देशात आणीबाणी जाहीर.

१९३०: ख्रायसलर सेंटर, न्यूयॉर्क - या त्याकाळातील सर्वात उंच (३१९ मीटर - १०४६ फूट) इमारतीचे उदघाटन झाले.

१९०६: महाराष्ट्र साहित्य परिषद - स्थापना.

१८८३: अलेक्झांडर (तिसरा) - रशियाचा झार बनला.

आज यांचा जन्म

१९७७: महेला जयवर्धने - श्रीलंकेचे क्रिकेटपटू

१९७५: मायकेल हसी - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९५७: नितीन गडकरी - भारतीय वकील आणि राजकारणी

१९३८: डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे - कादंबरीकार

१९२८: बिपन चंद्र - भारतीय इतिहासकार (निधन: ३० ऑगस्ट २०१४)

१९२३: हेन्री किसिंजर - अमेरिकेचे ५६ वे राष्ट्राध्यक्ष - नोबेल पुरस्कार

१९१३: कृष्णदेव मुळगुंद - चित्रकार व नृत्यदिग्दर्शक (निधन: ११ मे २००४)

आज यांची पुण्यतिथी

२०२१: पॉल श्लुटर - डेन्मार्क देशाचे ३७वे पंतप्रधान, वकील आणि राजकारणी (जन्म: ३ एप्रिल १९२९)

२०१३: जगजितसिंह लयलपुरी - भारतीय राजकारणी (जन्म: १० एप्रिल १९१७)

२००७: एड यॉस्ट - हॉट एअर बलूनचे निर्माते (जन्म: ३० जून १९१९)

१९९८: मिनू मसानी - अर्थतज्ञ (जन्म: २० नोव्हेंबर १९०५)

१९९४: लक्ष्मणशास्त्री जोशी - विचारवंत, तर्कतीर्थ (जन्म: २७ जानेवारी १९०१)

१९८६: अरविंद मंगरुळकर - संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक

१९८६: अजोय मुखर्जी - पश्चिम बंगालचे ४थे मुख्यमंत्री - पद्म विभूषण (जन्म: १५ एप्रिल १९०१)

१९६४: पं. जवाहरलाल नेहरू - भारताचे पहिले पंतप्रधान - भारतरत्न (जन्म: १४ नोव्हेंबर १८८९)

१९४२: चेन डक्सिउ - चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सह-संस्थापक (जन्म: ८ ऑक्टोबर १८७९)

१९३५: रमाबाई भीमराव आंबेडकर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी

१९२६: पॉल चेटर - भारतीय-हॉंगकॉंग उद्योजक व राजकारणी (जन्म: ८ सप्टेंबर १८४६)

१९१९: कंदुकुरी वीरेसालिंगम - भारतीय लेखक आणि कार्यकर्ते (जन्म: १६ एप्रिल १८४८)

१९१०: रॉबर्ट कोच - वैद्यकीय बॅक्टेरियोलॉजीचे जनक - नोबेल पुरस्कार (जन्म: ११ डिसेंबर १८४३)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com