Dinvishesh
DinvisheshTeam Lokshahi

31 July 2023 Dinvishesh : 31 जुलै दिनविशेष, जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

31 July 2023 Dinvishesh : सध्या जुलै महिना सुरू झाला आहे. तर जुलै महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत....
Published by :
Sagar Pradhan

Dinvishesh 31 July 2023 : सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 31 जुलै या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: अयमान अल-जवाहिरी - अल-कायदाचा दुसरा अमीर, दहशतवादी, यांचा अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार.

२०१२: मायकेल फेल्प्स - यांनी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सर्वाधिक पदक जीकाण्याचा विक्रम मोडला.

१९९२: जॉर्जिया - देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९६४: रेंजर ७ - अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्रे काढले.

१९५६: जिम लेकर - हे कसोटी सामन्यातील एका डावात सर्व १० गडी बाद करण्याचा विक्रम करणारे पहिले क्रिकेटपटू बनले.

१९५४: के-२ (माउंट गॉडविन ऑस्टिन) - हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शीखर प्रथमच सर करण्यात आले.

१८५६: ख्राइस्ट चर्च, न्यूझीलंड - स्थापना.

१६५८: औरंगजेब - मुघल सम्राट बनला.

१६५७: मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.

१४९८: ख्रिस्तोफर कोलंबस - त्रिनिदाद बेटांचा शोध लावणारे पहिले युपोपीय ठरले.

आज यांचा जन्म

१९९२: श्रेया आढाव - आहारतज्ज्ञ

१९६५: जे. के. रोलिंग - हॅरी पॉटर कादंबरी मालिकेच्या लेखिका

१९५४: मनिवंनान - भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक (निधन: १५ जून २०१३)

१९४७: मुमताज - हिंदी चित्रपट अभिनेत्री

१९४२: ऍटलास रामचंद्रन - भारतीय ज्वेलर, चित्रपट निर्माते आणि अभिनेते (निधन: २ ऑक्टोबर २०२२)

१९४१: अमरसिंग चौधरी - गुजरातचे ८वे मुख्यमंत्री (निधन: १५ ऑगस्ट २००४)

१९२३: अत्लम एर्टेगुन - अटलांटिक रिकॉर्ड्सचे सहसंस्थापक (निधन: १४ डिसेंबर २००६)

१९१९: हेमू अधिकारी - भारतीय क्रिकेटपटू (निधन: २५ ऑक्टोबर २००३)

१९१८: दादासाहेब वर्णेकर - संस्कृत पंडित (निधन: १० एप्रिल २०००)

१९१२: मिल्टन फ्रिडमन - अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक (निधन: १६ नोव्हेंबर २००६)

१९०७: दामोदर धर्मानंद कोसंबी - प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार (निधन: २९ जून १९६६)

१९०२: के. शंकर पिल्ले - व्यंगचित्रकार आणि लेखक (निधन: २६ डिसेंबर १९८९)

१८८६: फ्रेड क्विम्बी - अमेरिकन ऍनिमेशन चित्रपट निर्माते (निधन: १६ सप्टेंबर १९६५)

१८८०: प्रेमचंद - भारतीय हिंदी साहित्यिक (निधन: ८ ऑक्टोबर १९३६)

१८७२: ल. रा. पांगारकर - संत चरित्रकार आणि प्राचीन वाङ्मयाचे इतिहासकार (निधन: १० नोव्हेंबर १९४१)

१८७२: लक्ष्मणरामचंद्र पांगारकर - संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार (निधन: १० नोव्हेंबर १९४१)

१८००: फ्रेडरिक वोहलर - जर्मन रसायनशास्त्रज्ञ (निधन: २३ सप्टेंबर १८८२)

१७०४: गॅब्रिअल क्रॅमर - स्विस गणिती (निधन: ४ जानेवारी १७५२)

आज यांची पुण्यतिथी

२०१४: नबरुण भट्टाचार्य - भारतीय पत्रकार आणि लेखक (जन्म: २३ जून १९४८)

१९८०: मोहम्मद रफी - भारतीय सुप्रसिद्ध पार्श्वगायक - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: २४ डिसेंबर १९२४)

१९६८: पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर - चित्रकार, संस्कृत पंडित (जन्म: १९ सप्टेंबर १८६७)

१९४०: उधम सिंग - भारतीय स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक (जन्म: २८ डिसेंबर १८९९)

१८७५: अँड्रयू जॉन्सन - अमेरिकेचे १७वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २९ डिसेंबर १८०८)

१८६५: नाना शंकर शेटे - आधुनिक मुंबईचे शिल्पकार (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)

१८०५: धीरान चिन्नमलाई - भारतीय सैनिक (जन्म: १७ एप्रिल १७६५)

१७५०: जॉन (पाचवा) - पोर्तुगालचा राजा (जन्म: २२ ऑक्टोबर १६८९)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com