दिनविशेष 31 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 31 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मे महिना सुरू झाला आहे, तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 31 May 2024 : सध्या मे महिना सुरू झाला आहे. तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 31 मे रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: ISSF नेमबाजी विश्वकप - भारतीय महिला संघाने १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले.

१९९०: नेल्सन मंडेला - यांना लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर.

१९७०: पेरू - देशातील ७.९ तीव्रतेच्या भूकंपामुळे ७०,००० पेक्षा जास्त लोकांचे निधन तर ५०,००० पेक्षा जास्त लोक जखमी.

१९६१: दक्षिण अफ्रिका - देश प्रजासत्ताक बनला.

१९५२: संगीत नाटक अकादमी - स्थापना.

१९४२: दुसरे महायुद्ध - जपानी पाणबुड्यांनी सिडनी शहरावर हल्ला सुरू केला.

१९१०: दक्षिण अफ्रिका - देशाला स्वातंत्र्य मिळाले.

आज यांचा जन्म

१९६६: रोशन महानामा - श्रीलंकेचे क्रिकेटपटू

१९३८: वि. भा. देशपांडे - नाट्यसमीक्षक

१९३०: क्लिंट इस्टवूड - अमेरिकन अभिनेते व दिग्दर्शक

१९२८: पंकज रॉय - भारतीय क्रिकेटपटू (निधन: ४ फेब्रुवारी २००१)

१९२३: रेनियर III - मोनॅकोचे प्रिन्स (निधन: ६ एप्रिल २००५)

१९२१: सुरेश हरिप्रसाद जोशी - आधुनिक गुजराथीतील प्रसिद्ध कवी

१९१०: भा. रा. भागवत - बालसाहित्यकार व विज्ञानकथाकार (निधन: २७ ऑक्टोबर २००१)

१७२५: अहिल्याबाई होळकर - होळकर घराण्याच्या महाराणी (निधन: १३ ऑगस्ट १७९५)

१६८३: जीन पियरे क्रिस्टिन - सेल्सियस थर्मामीटरचे संशोधक (निधन: १९ जानेवारी १७५५)

आज यांची पुण्यतिथी

४५५: पेट्रोनस मॅक्झिमस - रोमन सम्राट

२०२२: कृष्णकुमार कुन्नाथ (केके) - सुप्रसिद्ध भारतीय गायक (जन्म: २३ ऑगस्ट १९६८)

२०२२: भीम सिंग - भारतीय राजकारणी, खासदार आणि जम्मू आणि काश्मीरचे आमदार (जन्म: १७ ऑगस्ट १९४१)

२००९: कमला सुरय्या - भारतीय कवी आणि लेखक (जन्म: ३१ मार्च १९३४)

२००३: अनिल बिस्वास - प्रतिभासंपन्न संगीतकार (जन्म: ७ जुलै १९१४)

२००२: सुभाष गुप्ते - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: ११ डिसेंबर १९२९)

१९९४: पंडित सामताप्रसाद - भारतीय तबलावादक - पद्म भूषण, पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (जन्म: २० जुलै १९२१)

१९७३: दिवाकर कृष्ण केळकर - कथालेखक (जन्म: १९ ऑक्टोबर १९०२)

१८७४: भाऊ दाजी लाड - प्राच्यविद्या पंडित, पुरातत्त्वज्ञ (जन्म: ७ सप्टेंबर १८२२)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com